महाराष्ट्र

maharashtra

भारतीय वंशाचे केवन पारेख Apple चे नवे CFO - Apple new CFO

By ETV Bharat Tech Team

Published : Aug 27, 2024, 1:01 PM IST

Updated : Aug 27, 2024, 3:18 PM IST

Apple new CFO : Apple कंपनीनं व्यवस्थापनात मोठा फेरबदल करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीनं भारतीय वंशाच्या केवन पारेख यांना कंपनीत महत्त्वाची जबाबदारी दिलीय.

Kevan Parekh
केवन पारेख (Etv Bharat MH Desk)

क्युपर्टिनो (कॅलिफोर्निया)Apple new CFO : Apple नं भारतीय वंशाचे केवन पारेख यांची मुख्य वित्तीय अधिकारी (CFO) म्हणून नियुक्ती केली आहे. केवन पुढील वर्षी जानेवारीपासून कंपनीचे सीएफओ म्हणून पदभार स्वीकारतील. याआधी, कंपनीनं आपल्या नवीन iPhone 16 सीरीजची लॉन्च तारीख देखील जाहीर केली आहे. नवीन iPhone 16 मालिका पुढील महिन्यात 9 सप्टेंबर रोजी लॉन्च होईल. तथापि, अलीकडील अहवालांमध्ये, नवीन iPhone 16 मालिकेची लॉन्च तारीख 10 सप्टेंबर असल्याचं सांगण्यात आलंय. केवन पारेख सध्या ॲपलमध्ये उपाध्यक्ष वित्तीय नियोजन म्हणून काम करतात.

ऍपलच्या सीईओनं केलं कौतुक : ऍपलचे सीईओ टिम कुक यांनी केवन पारेख यांची सीएफओ म्हणून नियुक्ती करण्याबाबत सांगितलं की, ते गेल्या दशकापासून कंपनीच्या आर्थिक विभागाचं नेतृत्व करत आहेत. त्यांना कंपनीच्या अंतर्गत गोष्टींची चांगली समज आहे. केवन कंपनीचं सध्याचे सीएफओ लुका मेस्त्री यांची जागा घेतील. 1 जानेवारी 2025 पासून लुका यांना कंपनीची दुसरी नवीन जबाबदारी देण्यात येणार आहे. टीम कुकनं केवन पारेखचं कौतुक केलं असून त्यांच्या निर्णयाची गुणवत्ता आणि इतर क्षमता लक्षात घेऊन त्यांना सीएफओची महत्त्वाची जबाबदारी देण्यात आल्याचं म्हटलं आहे. तसंच ते या भूमिकेसाठी योग्य असल्याचं त्यांनी सांगितलं.

कोण आहे केवन पारेख? :केवन जून 2013 पासून ॲपल कंपनीशी संबंधित आहे. त्यापूर्वी त्यांनी थॉम्पसन रॉयटर्समध्ये 4 वर्षे वेगवेगळ्या पदांवर काम केलंय. त्यांनी मिशिगन विद्यापीठातून विज्ञान शाखेची पदवी प्राप्त केली. त्याच वेळी त्यांनी शिकागो विद्यापीठातून एमबीए केलंय. यानंतर त्यांनी दिग्गज ऑटोमोबाईल कंपनी जनरल मोटर्समध्ये 5 वर्षे काम केलं. पारेख गेल्या 11 वर्षांपासून ऍपल कंपनीचं आर्थिक विभागाचं नेतृत्व करताय. जिथं त्यांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या होत्या. त्यांनी Apple चं उत्पादन विपणन, इंटरनेट विक्री आणि सेवा तसंच अभियांत्रिकी संघांचं नेतृत्व केलं आहे.

'हे' वाचलंत का :

  1. हायड्रोपोनिक शेतीतून लखपती होण्याची संधी, काय आहे हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञान? - hydroponic farming
  2. क्वांटम कम्युनिकेशनवर IIT मद्रासमध्ये आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित - Quantum Communication
  3. घरबसल्या असं करा आधार कार्ड अपडेट : ...अन्यथा 'या' तारखेनंतर मोजावे लागतील पैसे - Aadhaar Card Update
Last Updated : Aug 27, 2024, 3:18 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details