हैदराबाद : ट्रायच्या नवीनतम मार्गदर्शक तत्त्वांचं पालन करून, भारतातील प्रमुख टेलिकॉम कंपन्यांनी इंटरनेट डेटाची गरज नसलेल्या वापरकर्त्यांसाठी नवीन व्हॉइस आणि एसएमएस-ओन्ली प्लॅन लॉंच केले आहेत. पूर्वी, ग्राहकांना डेटासह प्लॅनची निवड करावी लागत होती. आता, एअरटेल, जिओ आणि व्हीआयनं स्वतंत्र व्हॉइस आणि एसएमएस प्लॅन लाँच केले आहेत. परंतु BSNL सर्वात स्वस्त व्हॉइस-ओन्ली प्लॅन ऑफर करत आहे.
नवीन व्हॉइस आणि एसएमएस प्लॅन
BSNL सर्वात परवडणारा व्हॉइस आणि एसएमएस-केवळ पर्याय देते. त्यांच्या 439 रुपयांच्या प्लॅनमध्ये 90 दिवसांसाठी अमर्यादित व्हॉइस कॉल आणि एसएमएस तुम्हा मिळतातय. हाच प्लन जिओ 84 दिवसांच्या वैधतेसाठी 448 रुपयांमध्ये येतो. परंतु जीओचा 1748 रुपयांचा दीर्घकालीन प्लॅन देखील आहे, जो 336 दिवसांसाठी वैध आहे, ज्यामध्ये अमर्यादित कॉल आणि 3600 एसएमएसची सुविधा मिळणार आहे.
एअरटेलचा प्लॅन महाग
दुसरीकडं, एअरटेलचे प्लॅन BSNL आणि जिओच्या तुलनेत महाग आहेत. 469 रुपयांच्या प्लॅनमध्ये 84 दिवसांसाठी अमर्यादित कॉलिंग आणि 900 एसएमएस मिळतातय. एअरटेलकडे 1849 रुपयांचा दीर्घकालीन प्लॅन आहे, जो पूर्ण 365 दिवसांसाठी वैध आहे. ज्यामध्ये अमर्यादित कॉल आणि 3600 एसएमएस तुम्हाला मिळतील. वडाफोन आयडिया 470 रुपयांचा असाच प्लॅन 84 दिवसांसाठी देत आहे, ज्यामध्ये अमर्यादित कॉल आणि 900 एसएमएस तुम्हाला मिळतील. त्यांचा दिर्घारकालीन प्लॅन 1460 रुपयात येतोय. या प्लॅनची वैधता 270 असून त्यात अमर्यादित कॉल आणि दररोज 100 एसएमएसचा समावेश आहे.
नवीन व्हॉइस आणि एसएमएस प्लॅन
- बीएसएनएल 90 दिवसांसाठी 439 रुपये, अमर्यादित कॉल + 300 एसएमएस
- जिओ 84 दिवसांसाठी 448 रुपये, अमर्यादित कॉल + 1000 एसएमएस
- 336 दिवसांसाठी 1748 रुपये, अमर्यादित कॉल + 3600 एसएमएस
- एअरटेल 84 दिवसांसाठी 469 रुपये, अमर्यादित कॉल + 900 एसएमएस
- 365 दिवसांसाठी 1849 रुपये, अमर्यादित कॉल + 3600 एसएमएस
- व्हडाफोन Vi 84 दिवसांसाठी 470 रुपये, अमर्यादित कॉल + 900 एसएमएस;
- 270 दिवसांसाठी 1460 रुपये, अमर्यादित कॉल + 100 एसएमएस/दिवस
हे व्हॉइस आणि एसएमएस-ओन्ली प्लॅन अशा वापरकर्त्यांसाठी आहेत, ज्यांना डेटाची आवश्यकता नाही.
हे वाचलंत का :