हैदराबाद : चीनी इलेक्ट्रिक कार उत्पादक कंपनी BYD नं भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 मध्ये त्यांची BYD Sealion 7 इलेक्ट्रिक SUV सादर केली होती. आता कंपनीनं ही कार भारतात 48.90 लाख रुपये (एक्स-शोरूम) सुरुवातीच्या किमतीत लाँच केली आहे. तसंच ही कार दोन प्रकारांमध्ये लॉंच झालीय.
BYD सीलियन 7 प्रकार आणि किंमत
कारचा बेस प्रीमियम व्हेरिएंट 48.90 लाख रुपयांच्या किमतीत लाँच करण्यात आला आहे, तर तिचं टॉप परफॉर्मन्स व्हेरिएंट 54.90 लाख रुपयांच्या (एक्स-शोरूम) किमतीत लाँच करण्यात आलं आहे. कंपनीच्या e6 (नंतर eMax7), Atto 3 आणि BYD Seal नंतर, BYD Sealion 7 ही भारतीय बाजारात विक्रीसाठी सादर होणारी BYD ची चौथी इलेक्ट्रिक कार आहे.
बीवायडी सीलियन 7 चं बाह्य डिझाइन
मिळालेल्या माहितीनुसार, या एसयूव्हीची डिलिव्हरी मार्चच्या मध्यात सुरू होईल. कंपनीला या कारच्या 1,0000 युनिट्सचं ऑर्डर आधीच मिळालं आहेत. त्याच्या डिझाइनबद्दल बोलायचं झालं तर, सीलियन 7 ची डिझाइन BYD सील सारख्या इतर BYD मॉडेल्ससारखीच आहे. तिच्या फ्रंट प्रोफाइलमध्ये अँगुलर हेडलॅम्प्स वापरण्यात आले आहेत, ज्यात DRL आहेत. साइड प्रोफाइलवर एक नजर टाकल्यास, BYD Sealion 7 मध्ये एक संतुलित डिझाइन आहे. चाकाच्या कमानीभोवती क्लॅडिंग, लक्षात येण्याजोगे हॉन्च आणि कूप एसयूव्हीसारखे दिसणारं छत आहे. याशिवाय, एसयूव्हीच्या मागील विंडस्क्रीनच्या खाली एक लहान बूट डेक देण्यात आला आहे. इलेक्ट्रिक कारच्या मागील बाजूस एक टेल लॅम्प आहे, जो वाहनाच्या मागील बाजूवर संपूर्ण पसरलेला आहे, तसंच एक प्रमुख मागील डिफ्यूझर देखील यात तुम्हाला मिळेल.
बीवायडी सीलियन 7 चा आतील भाग
कारच्या इंटीरियरबद्दल बोलायचं झालं तर, नवीन सीलियन 7 च्या बोर्डवर फ्रीस्टँडिंग 15.6 -इंच रोटेटिंग टचस्क्रीन आणि 10.25 -इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर बसवण्यात आलं आहे. एसयूव्हीचं एअर-कंडिशनिंग व्हेंट्स तिच्या टचस्क्रीनच्या खाली दिलेले आहेत. वैशिष्ट्यांबद्दल बोलायचं झालं तर, या कारमध्ये 8 वं पॉवर ॲडजस्टेबल ड्रायव्हर सीट आहे, ज्यामध्ये 4 वं लंबर ॲडजस्टमेंट आहे. याशिवाय, यात ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल आणि अँबियंट लाइटिंग, हेड-अप डिस्प्ले (HUD), 6-वे पॉवर ॲडजस्टेबल पॅसेंजर सीट, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट, पॅनोरॅमिक ग्लास रूफ, फ्लश डोअर हँडल, वायरलेस फोन चार्जर, 12-स्पीकर ऑडिओ सिस्टम आहे.
BYD सीलियन 7 ची सुरक्षा वैशिष्ट्ये
सुरक्षा वैशिष्ट्यांकडं पाहता, या इलेक्ट्रिक कारला ॲडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम (ADAS) सूट देण्यात आला आहे, ज्यामध्ये अॅडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, फ्रंट आणि रियर टक्कर वॉर्निंग, ऑटोमॅटिक ब्रेकिंगसह फ्रंट आणि रियर क्रॉस-ट्रॅफिक अलर्ट आणि लेन डिपार्चर वॉर्निंग सारखी वैशिष्ट्ये समाविष्ट आहेत.
बीवायडी सीलियन 7 ची पॉवरट्रेन
उपलब्ध असलेल्या पॉवरट्रेनबद्दल बोलायचं झालं तर, नवीन सीलियन 7 सिंगल-मोटर आणि ड्युअल-मोटर दोन्ही पर्यायांमध्ये सादर करण्यात आली आहे. दोन्ही प्रकारांमध्ये 82.5 kWh बॅटरी पॅक वापरण्यात आली आहे. कारची सिंगल-मोटर प्रकार जास्तीत जास्त 308 बीएचपी पॉवर देते, तर ड्युअल-मोटर 523 बीएचपीची एकत्रित पॉवर आउटपुट निर्माण करते. सिंगल-मोटर व्हेरिएंटमधील बॅटरी पॅक कमाल 587 किमीची रेंज देते, तर परफॉर्मन्स एडब्ल्यूडी व्हर्जन 542 किमीची रेंज देते. भारतीय बाजारपेठेत, नवीन BYD Sealion 7 ही BMW iX1 लाँग-व्हीलबेसशी स्पर्धा करेल, जी भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 मध्ये लाँच करण्यात आली होती.
हे वाचलंत का :