ETV Bharat / technology

ऑडी आरएस क्यू8 परफॉर्मन्स भारतात लाँच, ताशी 305 किलोमीटरपर्यंत टॉप स्पीड - AUDI RS Q8 PERFORMANCE LAUNCH

लक्झरी वाहन उत्पादक कंपनी ऑडीनं आज भारतात 17 फेब्रुवारी रोजी ऑडी आरएस क्यू8 परफॉर्मन्स (Audi RS Q8 Performance) कार लाँच केली आहे.

Audi RS Q8 Performance
ऑडी आरएस क्यू8 परफॉर्मन्स (Audi)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : Feb 17, 2025, 5:23 PM IST

Updated : Feb 17, 2025, 5:29 PM IST

हैदराबाद : लक्झरी वाहन उत्पादक कंपनी ऑडी भारतीय बाजारात विविध वाहनांची विक्री करतेय. कंपनीनं आज ऑडी आरएस क्यू8 परफॉर्मन्स (Audi RS Q8 Performance) कार लाँच केलीय. भारतातील भालाफेकपटू नीरज चोप्रा यांनी एका कार्यक्रमादरम्यान ही स्पोर्ट्स एसयूव्ही लाँच केली. कंपनीनं या कारमध्ये कोणत्या प्रकारची वैशिष्ट्ये दिली आहेत? किंमत काय आहे? ती कोणाशी स्पर्धा करेल? रेंज काय असेल? चला जाणून घेऊया या बातमीतून सविस्तर...

Audi RS Q8 Performance
कंपनीनं ऑडी आरएस क्यू8 परफॉर्मन्समध्ये चार लिटरचं व्ही8 इंजिन दिलं आहे. जे 640 हॉर्सपॉवर आणि 850 न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करतं. कंपनीनं या कारमध्ये 8-स्पीड टिपट्रॉनिक ट्रान्समिशन दिलं आहे. त्यामुळं कार फक्त 3.6 सेकंदात ०-100 किमी प्रतितास वेगानं धावते. या कारचा टॉप स्पीड ताशी 305 किलोमीटरपर्यंत आहे.

ऑडी आरएस क्यू8 परफॉर्मन्स वैशिष्ट्ये
ऑडी आरएस क्यू8 परफॉर्मन्सच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचं झालं तर, कंपनीनं 22 आणि 23 इंच अलॉय व्हील्स, 360 डिग्री कॅमेरा, 12.3 इंच इन्फोटेनमेंट सिस्टम, 12.3 इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, 17 स्पीकर्ससह बँग आणि ओलुफसेन ऑडिओ सिस्टम, ऑडी कनेक्ट केअर, हेडअप डिस्प्ले, फ्रंटला हनीकॉम्ब ग्रिल, एचडी मॅट्रिक्स एलईडी लाईट्स, डिजिटल ओएलईडी टेल लाईट्स, आरएस बॅजिंग, कार्बन पॅकेज, स्पोर्ट्स सीट्स, सिरेमिक ब्रेक्स, आरएस स्पोर्ट्स एक्झॉस्ट सिस्टम, अ‍ॅक्टिव्ह रोल स्टॅबिलायझेशन, रियर स्पोर्ट्स डिफरेंशियल, आरएस ट्यून केलेलं अ‍ॅडॉप्टिव्ह एअर सस्पेंशन, ऑल-व्हील स्टीअरिंग, पॅनोरॅमिक सनरूफ, पॉवर लॅचिंग डोअर्स, व्हेंटिलेटेड सीट्स, फोर-झोन क्लायमेट कंट्रोल, एअर क्वालिटी पॅकेज, अ‍ॅडजस्टेबल आणि अ‍ॅडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल तसंच इंटरसेक्शन असिस्ट, रिमोट पार्क असिस्ट प्लस, नाईट व्हिजन असिस्ट सारखी अनेक वैशिष्ट्ये दिली आहेत. यामध्ये 8 स्टँडर्ड आणि 9 एक्सक्लुझिव्ह कलर्सचा समावेश आहे.

ऑडी आरएस क्यू 8 परफॉर्मन्स किंमत
या एसयूव्हीची एक्स-शोरूम किंमत 2.49 कोटी रुपये आहे. या कारची बुकिंग लाँच होण्यापूर्वीच सुरू झाली होती. तुम्ही ही कार 5 लाख रुपयांना ऑनलाइन आणि ऑफलाइन बुक करू शकता.

कुणाशी करणार स्पर्धा
भारतीय बाजारात लॅम्बोर्गिनी उरुस आणि पोर्श सारख्या शक्तिशाली एसयूव्हीशी स्पर्धा करेल.

हे वाचलंत का :

  1. BYD Sealion 7 इलेक्ट्रिक SUV भारतात लाँच, एका चार्जवर 587 किमीची रेंज
  2. महिंद्रा BE6 आणि XEV 9e ची बुकिंग सुरू झाली आहे, कसं करणार बुकींग
  3. जानेवारी 2025 मध्ये प्रवासी वाहनांची 9.99 लाख युनिट्सची विक्रमी विक्री

Last Updated : Feb 17, 2025, 5:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.