उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या धोरणांवर टीका करताना धाराशिवUddhav Thackeray :माजू पाहणाऱ्या हुकूमशहाचे मर्दन करून भारतमातेचं रक्षण करा, असं आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महिला दिनाचं औचित्य साधून केलंय. ठाकरे कालपासून धाराशिव जिल्ह्याच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत. शहरातील एका हॉटेलमध्ये ठाकरे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते.
यापुढचे सरकार मोदींचे नसणार :कार्यक्रमामध्ये खासदार संजय राऊत, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील यांची उपस्थिती होती. तसंच वंचित बहुजन आघाडी वगळता आघाडीतील सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. 'इंडिया'च्या माध्यमातून देशातील देशभक्त एकत्र येत आहेत. म्हणून भाजपाच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. त्यामुळे मोदी काही वस्तूंच्या किमती कमी करू लागले आहेत. यापुढचे सरकार मोदींचे नसणार, असा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलाय.
'त्या' महिला कुस्तीपटू मोदींच्या परिवारात नाहीत का-यावेळी उद्धव ठाकरे उपस्थितांना उद्देशून म्हणाले की, 2014 ला भाजपाने दिलेली आश्वासने किती पूर्ण झाली, काय मिळाले दहा वर्षांत यावर प्रश्न विचारावे. 'मेरा देश, मेरा परिवार' असे मोदी सांगत आहेत. तेव्हा मणिपूरच्या महिला आणि भारतीय महिला कुस्तीपटू या मोदींच्या परिवारात नाहीत का? असा प्रश्न ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला. लढाई मोठी आहे, फसू नका, कुठंही अडकू नका आणि विजयाचा गुलाल उधळल्याशिवाय थांबू नका, असा सल्ला उपस्थित सर्व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला.
'त्या' महिला आंदोलकांकडे मोदी सरकारचे दुर्लक्ष :काही महिन्यांपूर्वी ऑलंपिक विजेत्या महिलांनी भाजपाच्या खासदारावर लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला होता. याविरुद्ध त्यांनी आंदोलन करत पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे दादही मागितली होती. परंतु, केंद्र सरकारने त्यांच्या या आंदोलनाकडे सपशेल दुर्लक्ष केलं. या घटनेचा संदर्भ उद्धव ठाकरेंनी जागतिक महिला दिनी त्यांच्या भाषणातून दिला.
हेही वाचा:
- रामोजी फिल्मसिटीमध्ये महिला दिन उत्साहात साजरा, मंत्री सीताक्का म्हणाल्या 'स्काय इज द लिमिट'
- भगरीतून विषबाधा झालेल्या रुग्णांची कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केली विचारपूस
- तत्कालीन गृहमंत्री वळसे पाटील यांच्या आदेशानुसार वकील म्हणून नियुक्ती, किशोर भालेरावांना न्यायालयाचा दिलासा