हैदराबाद : नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे गेल्या अनेक महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात अडकून पडले आहेत. त्यांनी अवकाशातूनच 2025 या नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत केलं. या दोन अंतराळवीरांनी त्यांच्या सहकारी क्रू सदस्यांसह, अवकाशातून पृथ्वीची काही दृश्ये पाहिली.
ISS वर 16 सूर्योदय आणि सूर्यास्त : विल्यम्ससह त्यांचे सहकारी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) एकाच दिवसात अनेक सूर्योदय आणि सूर्यास्त पाहत आहे, जे एक असामान्य दृश्य आहे. इंटरनॅशनल स्पेस स्टेशननं आपल्या अधिकाऱ्यामार्फत ही माहिती दिलीय. ISS पृथ्वीभोवती दिवसातून 16 वेळा फिरते आणि त्याचा सरासरी वेग ताशी 28,000 किलोमीटर आहे. हे सुमारे 400 किलोमीटर उंचीवर आहे.
टीमचा मुक्काम लक्षणीयरीत्या वाढला : विल्यम्स जून 2024 पासून बोईंगच्या स्टारलाइनर अंतराळयानावर अडकून पडल्या आहेत. त्यांना या मोहिमेचं कमांडर म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं. हे अभियान 8 दिवसांचं होतं, परंतु विल्यम्स अजूनही त्यांच्या टीमसह अंतराळात अडकल्या आहेत. तांत्रिक कारणामुळं त्यांच्या टीमचा मुक्काम लक्षणीयरीत्या वाढला आहे. ते मार्च 2025 पर्यंत अंतराळात राहण्याची असल्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत, विल्यम्स आणि त्यांच्या टीमला एक दुर्मिळ नवीन वर्ष अनुभवायला मिळेल कारण आयएसएस अंदाजे दर 90 मिनिटांनी ग्रहाभोवती फिरतं.
या क्रूनं विविध उपक्रमांसह नवीन वर्ष साजरे केलंय. ज्यामध्ये पृथ्वीवरून पाठवलेल्या ताज्या घटकांपासून बनवलेले खास जेवण समाविष्ट होतं. त्यांनी व्हिडिओ कॉलद्वारे कुटुंब आणि मित्रांशी देखील संपर्क साधत नववर्षच्या शुभेच्या दिल्या आहेत. विल्यम्सनं यापूर्वी अशा अनोख्या अनुभवाचा भाग असल्याचा आनंद व्यक्त केला आहे, अंतराळाचं वर्णन त्यांनी "आनंदी ठिकाण" असं म्हटलं होतं. नवीन वर्ष साजरे करण्याव्यतिरिक्त, विल्यम्स आणि तिच्या क्रूनं अलीकडेच ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या होत्या.
'हे' वाचलंत का :