महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महायुती सरकारमध्ये टोळीयुद्ध सुरू-उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप - जनसंवाद यात्रा

Uddhav Thackeray News : जनसंवाद यात्रेनिमित्त उद्धव ठाकरे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांचं आज सावंतवाडीत जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी त्यांनी महायुती सरकारमध्ये टोळीयुद्ध सुरू असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 4, 2024, 8:11 PM IST

उद्धव ठाकरे यांचं भाषण

सिंधुदुर्गUddhav Thackeray News :भाजपाची महायुती कमकुवत झाल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केला. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समजून घेतलं पाहिजे, असंदेखील उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ठाण्यातील उल्हासनगर भागातील पोलीस ठाण्यात स्थानिक शिवसेना नेत्यावर (मुख्यमंत्री एकनाथ शिंदे छावणीचे) सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) आमदाराने गोळीबार केल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे वक्तव्य केलं.

सरकारमध्ये टोळीयुद्ध :सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीत एका सभेला संबोधित करताना ठाकरे म्हणाले की, 1990 च्या दशकात शिवसेना-भाजपा सरकारनं मुंबईतील अंडरवर्ल्ड टोळ्यांचं कंबरडं मोडलं होतं. "परंतु, सध्याच्या सरकारमध्ये आता टोळीयुद्ध सुरू झालं आहे. 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्यातील तिसरी टोळी भाजपाच्या गळ्यात पडली आहे. त्यामुळं त्यांना डोकंवर काढायला वेळ नाही," असा आरोप उद्धव ठाकरे कुणाचंही नाव न घेता केला.

पुढच्या वर्षी प्रजासत्ताक दिन होणार नाही :इतर पक्षांना फोडून भाजपात सामील करून घेण्याच्या प्रवृत्तीमुळं राज्य भाजपा युनिट "कमकुवत" झालं आहे. हे मोदींनी समजून घ्याला हवं असा हल्लाबोल देखील ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केला आहे. माझा कोणत्याही एका व्यक्तीला विरोध नसून खोटेपणा हुकूमशाहीला विरोध आहे. देशात पूर्ण बहुमत असलेल्या सरकारची गरज नाही. तर विविध विचारांच्या पक्षांना सोबत घेऊन जाणाऱ्या सरकारची देशाला गरज आहे, असंही ठाकरेंनी सांगितलं. "जर भाजपा पुन्हा लोकसभा निवडणुकीत जिंकल्यास पुढच्या वर्षी प्रजासत्ताक दिन होणार नाही," असा दावा त्यांनी केला.

  • पंतप्रधानांनी मालवणात येऊन पाणबुडी नेली : नौदल दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी मालवणात आले होते. मात्र, त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याला काही दिलं नाही. तर मंजूर पाणबुडी प्रकल्प गुजरातला नेल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

सत्तेच्या उबेसाठी सबुरी विसरली : शिवसेना कोणांची 'हे' ठरवण्यासाठी गद्दारांची गरज नाही. ती जनतेला माहीत आहे. जनता माझं सर्वस्व आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचं नाव न घेता केली आहे. आठवड्यातून दोनदा शिर्डीला जाणारे लोक सत्तेच्या उबेसाठी आपली श्रद्धा आणि सबुरी विसरतात, असा टोलादेखील ठाकरेंनी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना लगावला आहे. माझ्याकडं आलेला माणूस चांगला आहे, असं म्हणत तुम्ही त्याला निवडून दिलं. मात्र, त्यांनी गद्दारी केली. त्यांच्या नसानसात गद्दारी भिनली आहे, अशा शब्दात त्यांनी केसरकर यांचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केली.

  • हृदयात राम असणार हिंदुत्व : आम्ही हिंदुत्व सोडलं, म्हणून आरडाओरडा करून धर्मांमध्ये भांडणे लावणारा आमचा हिंदू धर्म नाही. आमच्या हृदयात राम तसंच जनतेच्या हाताला काम असं आमचं हिंदुत्व आहे, असं ठाकरेंनी म्हटलं आहे. काँग्रेसनं राबवलेल्या योजनाच्या नावात बदल करून भाजपा त्या राबवत असल्याची टीका ठाकरेंनी केली आहे.

हे नेते होते उपस्थित-यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव, वैभव नाईक, वरुण सरदेसाई, मिलिंद नार्वेकर, गौरीशंकर खोत, अरुण दुधवडकर, जान्हवी सावंत, जिल्हाप्रमुख संजय पडते, संदेश पारकर, सतीश सावंत, अतुल रावराणे, शैलेश परब, रुपेश राऊळ, बाळा गावडे, सुशांत नीरव, गणेश नाईक, रावसाहेब दानवे, नारायण सावंत, संजय पडते, संदेश पारकर, दळवी भारती आदिंची उपस्थिती होती.

ABOUT THE AUTHOR

...view details