मुंबईVoice Feminization Surgery: राज्यातील तृतीयपंथीयांसाठी (Transgender) एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जी.टी. रुग्णालयामध्ये तृतीयपंथीय रुग्णांकरीता स्वतंत्र कक्ष तयार करणात आला होता. त्या कक्षामार्फत उपचाराबरोबरच विविध सेवा-सुविधा देण्यात येत होत्या. याचेच पुढील पाऊल म्हणून जी.टी. रुग्णालयात व्हॉइस सर्जरी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आलीय. याद्वारे ट्रान्स जेंडर यांच्या आवाजामध्ये बदल करण्याचा उपचार होणार आहेत. यात कान, नाक, घसा विभागा अंतर्गत 'व्हॉइस सर्जरी' सुरू करण्यात आलीय. याकरिता दर मंगळवार आणि गुरुवारी जी.टी. हॉस्पिटलमध्ये उपचार केले जाणार आहेत.
यांनाही होणार फायदा : या खास उपक्रमाकरिता डॉ. नुपूर कपूर नेरुळकर स्वरयंत्र रोग तज्ञ बॉम्बे रुग्णालय यांची नियुक्ती मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री वैद्यकीय शिक्षण विभाग यांच्या मार्गदर्शनानं करण्यात आलीय. ज्या व्यक्तींचे लिंग बदल (पुरुष ते स्त्री लिंग बदल) शस्त्रक्रिया झाल्या आहेत. त्यांना विशेषतः या शस्त्रक्रियेचा फायदा होईल असं बोललं जातंय. यासोबतच कान, नाक, घशाशास्त्र विभाग, जे. जे रुग्णालय येथे याही सुविधा सर्वसामान्यांकरीता शासकीय दरात उपलब्ध आहेत.