महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

साई दरबारात गाजलं तामिळनाडूतील प्रसिद्ध कुम्मी नृत्य ; भाविकांसह ग्रामस्थांनी दिली मनमुराद दाद - Kummi Folk Dance In Shirdi Temple - KUMMI FOLK DANCE IN SHIRDI TEMPLE

Kummi Folk Dance In Shirdi Temple : तामिळनाडू राज्यातील भाविकांनी शिर्डीतील साईबाबा मंदिर इथं सुप्रसिद्ध कुम्मी लोकनृत्य सादर केलं. या ग्रुपमध्ये तब्बल 120 महिला आणि 30 पुरुष कलावंतांचा समावेश आहे.

Kummi Folk Dance In Shirdi Temple
कुम्मी नृत्य सादर करताना कलावंत (Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 29, 2024, 12:34 PM IST

Updated : Aug 29, 2024, 6:50 PM IST

साई दरबारात गाजलं तामिळनाडूतील प्रसिद्ध कुम्मी नृत्य (Reporter)

शिर्डी Kummi Folk Dance In Shirdi Temple :तामिळनाडू राज्यातील भाविकांनी आज शिर्डीत येवून आपलं पारंपरिक असलेलं 'कुम्मी' हे नृत्य साईबाबांच्या शिर्डीत सादर केलं. साईबाबांवर असलेली अपरंपार श्रद्धा या लोकनृत्याच्या माध्यमातून तामिळनाडूतील भाविकांनी व्यक्त केली आहे. तिरुपूर येथील पावलाकोडी कुम्मीयाट्टकुट्टू हा ग्रुप आज साईबाबांच्या शिर्डीत आला. या ग्रुपमध्ये तब्बल 120 महिला तर 30 पुरुष कलाकारांचा सहभाग आहे.

कुम्मी नृत्य सादर करताना कलावंत (Reporter)

भाविकांनी लुटला कुम्मी लोकनृत्याचा आनंद :तामिळनाडू राज्यातील तिरुपूर येथील पावलाकोडी कुम्मीयाट्टकुट्टू हा ग्रुप आज साईबाबांच्या शिर्डीत आला. या ग्रुपमधील तब्बल 120 महिला आणि 30 पुरुषांनी आपल्या राज्यातील लोकप्रिय असलेलं 'कुम्मी' हे पाच तासांचं लोकनृत्य साईबाबा मंदिराच्या 3 नंबर प्रवेशद्वारा जवळील श्री साईबाबा शताब्दी मंडपात सादर केलं. या 'कुम्मी' लोकनृत्यादरम्यान सर्व महिलांनी हिरव्या साड्या परिधान केलेल्या दिसल्या. त्यांनी त्यांच्या नृत्यादरम्यान विविध युक्त्या दाखवल्या. या 'कुम्मी' लोकनृत्यामध्ये 15 वर्षांच्या मुलींपासून तर 40 वर्षीय वयोगटातील महिलांपर्यंत सर्वजणांनी कुम्मी गाण्यांवर नृत्य केलं. असं लोकनृत्य पहिल्यांदाच शिर्डीत सादर झाल्यानं भाविकांसह शिर्डी ग्रामस्थांनी मनमुराद दाद दिली.

कुम्मी नृत्य सादर करताना कलावंत (Reporter)

लोकनृत्य सादर करण्याचं भाग्य मिळल्यानं झाला आनंद :भाविकांचे 'कुम्मी' नृत्य संपल्यानंतर साईबाबा संस्थानच्या वतीनं या सर्व भाविकांचा शॉल, श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. यानंतर या सर्व भाविकांनी साई मंदिरात जावून साईबाबांच्या समाधीचं मनोभावे दर्शन घेतलं. "साईबाबांच्या शिर्डीत आम्हाला आमच्या राज्यातील पारंपरिक असलेलं "कुम्मी" हे लोकनृत्य सादर करण्याचं भाग्य मिळल्यानं आम्ही खूप आनंदी झालो, अशी भावनाही यावेळी भाविकांनी व्यक्त केलीय.

कुम्मी नृत्य सादर करताना कलावंत (Reporter)

साईबाबांच्या समाधीला शंभर वर्षे पूर्ण :2018 साली साईबाबांच्या समाधीला शंभर वर्षे पूर्ण झाले आहेत. या शताब्दी वर्षात भाविकांकडून विविध धार्मिक कार्यक्रम तसेच लोकनृत्य कला सादर करण्यात येणार आहेत. त्यामुळं साईबाबा संस्थानच्या वतीनं साई मंदिराच्या 3 नंबर प्रवेश द्वाराजवळ 16 गुंठे जागेत श्री साईबाबा शताब्दी मंडप उभारला. साई समाधी शताब्दी वर्षात अनेक भाविकांनी आप आपल्या राज्यातील आपल्या भाषेतील भजन, कीर्तन आणि नृत्य साई दरबारी सादर केलं. अनेक भाविकांची ईच्छा असते की आपल्यातील कला देवाच्या दारी सादर करण्याची संधी मिळावी. साई समाधी शताब्दी वर्षांपासून आजपर्यंत अनेक राज्यातील भाविकांनी शिर्डीत येवून साई दरबारी विविध लोकनृत्य, कला सादर केली आहे. अनेक राज्यातील भाविक साई संस्थानशी संपर्क साधून कला सादर करण्यासाठी इच्छा व्यक्त करत आहेत. कलाकार भाविकांना साई दरबारी आपली कला सादर करण्याची संधी मिळत असल्यानं भाविकही आनंदी होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

हेही वाचा :

  1. शिर्डीच्या साईबाबांना तब्बल 35 किलोची भव्य राखी अर्पण; छत्तीसगडच्या भक्तानं तयार केली खास राखी - Raksha Bandhan 2024
  2. साईनगरीत गोकुळाष्टमीची धूम, साईभक्तांनी दहीहंडी फोडत उत्सव केला साजरा - Shirdi Saibaba Dahi Handi
  3. आंध्रप्रदेशचे राज्‍यपाल एस.अब्‍दुल नजीर सहकुटुंब साईचरणी नतमस्तक; म्हणाले... - Andhra Pradesh Governor In Shirdi
Last Updated : Aug 29, 2024, 6:50 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details