मुंबई : ग्लोबल स्टार एड शीरन सध्या भारताच्या दौऱ्यावर आहे. अलीकडेच एका स्ट्रीट शो दरम्यान पोलिसांनी त्याचा कार्यक्रम थांबवला होता. यानंतर तो चर्चेत आला होता. आता पोलिसांनी यावर एक निवेदन जारी केलं आहे. बेंगळुरूमधील चर्च स्ट्रीटवर अलीकडेच झालेल्या ब्रिटिश गायक एड शीरनच्या रस्त्याच्या कडेला असलेल्या लाईव्ह परफॉर्मन्सला पोलिसांनी थांबवल्यानंतर अनेकांनी यावर नाराजी व्यक्त केली. याप्रकरणी एडच्या चाहत्यांना देखील धक्का बसला होता. या घटनेनंतर, गायकाच्या टीमनं दावा केला की, हा कार्यक्रमाची परवानगी घेण्यात आली होती. आता पोलिसांनी या प्रकरणाबाबत खुलासा केला गेला आहे. पोलिसांच्या मते, अशी कुठलीही परवानगी देण्यात आली नव्हती.
एड शीरनच्या परफॉर्मन्सला पोलिसांनी परवानगी दिली नाही : डीसीपी सेंट्रल बेंगळुरू शेखर टी टेक्कनवर यांच्यानुसार, कार्यक्रमाच्या आयोजकांपैकी एक त्यांना भेटण्यासाठी आला होता. त्यांनी चर्च स्ट्रीटवर प्रदर्शन करण्याची परवानगी मागितली होती. यावर शेखर टी टेक्कनावर यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की, त्या ठिकाणी प्रचंड गर्दी असल्यानं परवानगी देण्यात येत नाही. यानंतर बंगळुरू पोलिसांनी एड शीरनला रस्त्यावर परफॉर्म करू दिलं नाही. दरम्यान सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एड शीरन 'शेप ऑफ यू' या गाण्यानं त्याच्या सादरीकरणाची सुरुवात करताना दिसत आहे. तो त्याच्या चाहत्यांना खुश करण्यासाठी खूप उत्सुक असल्याचा दिसत आहे. यानंतर लगेचच पोलिस अधिकारी येतात आणि त्याची साउंड सिस्टम डिस्कनेक्ट करतात. ही गोष्टी झाल्यानंतर एडचं चाहते खूप दु:खी झाले आहे.
#BREAKING: Ed Sheeran gets unplugged by Bengaluru cops as he was performing on Church Street on Sunday morning. The cops, unaware of who he was, said prior permission was not taken to perform. pic.twitter.com/k7gpdGj9tu
— Aditya Raj Kaul (@AdityaRajKaul) February 9, 2025
Went for a casual walk on Church Street and stumbled upon Ed Sheeran performing live. What a city! @peakbengaluru pic.twitter.com/pNnzW378yj
— Sahil Kaling (@sahilkaling_) February 9, 2025
A police officer pulled the plug when Ed Sheeran surprised everyone on Church Street😂😭😭😭 pic.twitter.com/cMIRoLC7Mk
— Naai sekar (@snehaplsstop) February 9, 2025
ब्रिटिश गायक भारत दौऱ्यावर : ब्रिटिश गायक एड हा अनेक शहरांमध्ये त्याचा शो करत आहे. त्याच्या शोला अनेकजण पाहायला देखील जात आहेत. यापूर्वी त्यानं हैदराबाद आणि चेन्नईमध्ये कॉन्सर्ट केला होता. हैदराबादमध्ये त्यानं बॉलिवूड गायक अरमान मलिकबरोबर परफॉर्म केलं होतं. यानंतर त्यानं चेन्नईमध्ये संगीतकार एआर रहमानबरोबर स्टेज शेअर केला होता. एआर रहमाननं इंस्टाग्रामवर त्याच्यासोबतचे काही फोटो शेअर केले आहेत.
हेही वाचा :