महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जावेला हरवण्यासाठी 'जाऊबाई जोरात'; केला गंभीर आरोप - Sunanda Pawar

Sunanda Pawar : राज्याचं नव्हे तर देशाचं लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात आता पवार विरुद्ध पवार अशी लढत होत आहे. दोन्ही पवारांकडून एकमेकांवर आरोप, प्रत्यारोप होताना दिसून येत आहे. अशातच गुरुवारी (25 एप्रिल) बारामती लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ सुनंदा पवार यांनी प्रचार केला. त्यांनी निवडणुकीच्या शेवटच्या दिवसात धनशक्तीचा वापर होणार असल्याचा आरोप केलाय.

Sunanda Pawar
सुनंदा पवार

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 25, 2024, 7:13 PM IST

Updated : Apr 25, 2024, 8:38 PM IST

सुनंदा पवार विरोधी पक्षाच्या दडपशाहीविरुद्ध बोलताना

पुणे Sunanda Pawar : बारामती लोकसभा निवडणूक देशात चर्चेत आहे. अशात रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्यासाठी प्रचार सुरू केलाय. "बारामतीच्या प्रत्येक गावामध्ये अनोळखी लोकं फिरताना दिसत आहेत आणि वेगळ्या भाषेत बोलताना दिसत आहेत. शेवटच्या दोन-तीन दिवसांमध्ये धनशक्तीचा आणि दडपशाहीचा वापर होईल," असा दावा आमदार रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार यांनी यावेळी केला. बारामती तालुक्यातील जळगाव सुपे गावात महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारानिमित्त झालेल्या सभेत सुनंदा पवार बोलत होत्या.

धनशक्तीचा वापर होईल : "प्रचाराच्या शेवटच्या दिवसांमध्ये बारामती लोकसभेसाठी धनशक्तीचा आणि दडपशाहीचा वापर केला जाईल," असा दावा रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार यांनी केलाय. सुनंदा पवार यांनी सुप्रिया सुळे यांचा प्रचार सुरू केलाय. यावेळी बोलताना सुनंदा पवार यांनी विरोधी पक्षाच्या उमेदवारांवर जोरदार टीका केली. सध्या बारामती लोकसभा मतदारसंघ देशात चर्चेत आहे. पवार विरुद्ध पवार असा सामना रंगत असल्यानं या मतदारसंघाकडं सर्वांचंच लक्ष लागलंय.

काम करून नाव मोठं करा : राज्य नव्हे तर देशाचे लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या दोन्ही पक्षाच्या उमेदवारांकडून बारामती लोकसभा मतदारसंघात जोरदार प्रचार सुरू आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील विविध मतदारसंघात नागरिकांच्या गाठीभेटी घेणे तसेच प्रचार रॅली या दोन्ही उमेदवारांकडून सुरू आहे. अशातच खासदार सुप्रिया सुळे यांनी भोर तालुक्याच्या दौऱ्यादरम्यान मतदारांशी संवाद साधला. यावेळी पानवळ या गावातील भागूबाई विठ्ठल कोंढाळकर या आजीबाईंनी 'भारत वाचवा' असं आवाहन करत लोकशाहीच्या रक्षणाचं महत्त्व सांगितलं. 'आपण मराठी आहोत, कष्ट करू पण भारत वाचवू' असं सांगत त्यांनी पक्षांतर करणाऱ्या नेत्यांना खडे बोल देखील सुनावले. काम करून भोर तालुक्याचे नाव मोठे करा, असा आशीर्वाद त्यांनी सुप्रिया सुळे यांना यावेळी दिला.

हेही वाचा :

  1. बारामतीत 'तुतारी' चिन्हावर दोन उमेदवार रिंगणात; काय आहे नेमका मॅटर? - Lok Sabha Election 2024
  2. अमरावतीला फसवणूक नको विकास पाहिजे, विरोधकांची टीका; तर खासदारांनी शेकडो कोटींचा विकास केला, सत्ताधाऱ्यांचा दावा - Amravati Lok Sabha Constituency
  3. उमेदवारीबाबत मुख्यमंत्र्यांचा छगन भुजबळांना आला होता फोन; पण.... - Lok Sabha election 2024
Last Updated : Apr 25, 2024, 8:38 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details