मुंबई Uddhav Thackeray Local Train Journey :लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे. निवडणुकीतील प्रचारासाठी राजकीय नेत्यांना वेळेत प्रचाराला पोहोचावे लागते. तसंच सभेच्या ठिकाणी वेळेत पोहचावे लागते वेळेत पोहोचण्यासाठी नेते कधी विमान, हेलिकॉप्टर किंवा खाजगी वाहनाने प्रवास करतात. मात्र, आज ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पालघर येथील सभेतून परत येताना चक्क रेल्वे लोकल प्रवास केला.
बोईसर ते बांद्रा ट्रेननी केला प्रवास :आज उद्धव ठाकरे यांची पालघर येथे सभा घेतली. पालघर येथील ठाकरे गटाच्य उमेदवार भारती कामडी यांच्या प्रचारासाठी सभा घेतली. या सभेत उद्धव ठाकरे यांनी महायुती, केंद्र सरकार आणि नरेंद्र मोदी यांचा खरपूस समाचार घेतला. ही सभा पार पडल्यानंतर मुंबईत परत येताना कोणत्याही खासगी वाहनाने प्रवास न करता उद्धव ठाकरे यांनी बोईसर ते बांद्रा असा ट्रेननी प्रवास केला.
ट्रेनमध्ये आणखी कोण? :उद्धव ठाकरे आणि बोईसर ते बांद्रा असा ट्रेनने प्रवास केला. यावेळी प्लॅटफॉर्मवरती उद्धव ठाकरे येताच शिवसैनिक आणि कार्यकर्त्यांनी मोठी घोषणाबाजी केली. तसंच, त्याच ट्रेनच्या डब्यात काही कार्यकर्त्यांनी देखील प्रवास केला. दरम्यान, यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत ट्रेनमध्ये खासदार संजय राऊत, मिलिंद नार्वेकर ही देखील सोबत होते. यावेळी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत मोबाईल पाहण्यात मग्न होते उद्धव ठाकरे यांनी आपल्या मोबाईल मधील काही माहिती किंवा व्हिडिओ संजय राऊताना दाखविल्याचे व्हिडिओतून समोर येत आहे. सध्या उद्धव ठाकरे यांनी बोईसर ते बांद्रा असा ट्रेनने केलेल्या प्रवासाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.