महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गृहमंत्री पदावरुन संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल; नागपूर प्रकरणावरुन चंद्रशेखर बावनकुळेंवर टीका - Sanjay Raut On Devendra Fadnavis

Sanjay Raut On Devendra Fadnavis : नागपूर शहरात कारनं धडक दिलेनंतर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही कार भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा चालवत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. यावरुन उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर जोरदार टीका केली.

Sanjay Raut On Devendra Fadnavis
संपादित छायाचित्र (ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 10, 2024, 11:36 AM IST

मुंबई Sanjay Raut On Devendra Fadnavis : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळे याच्या नावावर असलेल्या ऑडी कारनं रविवारी मध्यरात्री पाच दुचाकी आणि वाहनांना धडक दिली. या अपघातात चार जण जखमी झाले असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. या अपघात प्रकरणी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळे याचं नाव नाही. त्यावरन उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.

ड्रायव्हरची अदलाबदली केली गेली : याप्रसंगी बोलताना संजय राऊत म्हणाले की, "नागपूर अपघात प्रकरणात बावनकुळे कुटुंबाचा संबंध नसेल, तर लपवाछपवी कशासाठी करत आहात ? गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर शहरातच कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे. अपघात प्रसंगी गाडी कोण चालवत होतं? गाडी कोणाच्या नावावर आहे? अपघात झाल्यानंतर ड्रायव्हरची अदलाबदली केली गेली. हे सर्व रेकॉर्डवर आहे. तसेच आरटीओ ऑफिसरनं नंबर प्लेट का बदलली? अशा प्रश्नांची सरबत्ती संजय राऊत यांनी केली. देवेंद्र फडवणीस गृहमंत्री पदावर राहण्याच्या योग्यतेचे नसल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.

देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असेपर्यंत निष्पक्ष तपास होणार नाही :संजय राऊत पुढे म्हणाले की, "आतापर्यंत दुसरा कोणी असता, तर त्याच्या घरापर्यंत पोलीस गेले असते. जर हा विरोधी पक्षाच्या नेत्याचा मुलगा असता, तर चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या फौजा आमच्यावर तुटून पडल्या असत्या. या अपघातात दोन जण गंभीर जखमी असून सुद्धा जर चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा गाडी चालवत होता, तर मग एफआयआरमध्ये नाव का नाही? जोपर्यंत या राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, तोपर्यंत कुठल्याही प्रकरणाचा निष्पक्ष तपास होणार नाही. जोपर्यंत या राज्याच्या पोलीस महानिरीक्षक रश्मी शुक्ला आहेत, तोपर्यंत कुठल्याही प्रकरणाचा निष्पक्ष तपास होणार नाही. तुम्ही लाहोरी बारचं सीसीटीव्ही फुटेज तपासा. त्यामध्ये कोणी नशा केली हे सर्व स्पष्ट होईल," असंही संजय राऊत म्हणाले. तसेच "कायदा सर्वांसाठी समान असं नरेंद्र मोदी म्हणतात. परंतु राज्यात असं नाही. या राज्यात गरिबांना एक न्याय आणि श्रीमंतासाठी दुसरा न्याय आहे."

हेही वाचा :

  1. अजित पवार यांनी आता पश्चाताप करून काय उपयोग - संजय राऊत - Sanjay Raut
  2. "उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना 'लालबागचा राजा'..."; आशिष शेलारांचा संजय राऊतांवर पलटवार - Ashish Shelar on Sanjay Raut
  3. अमित शाह 'लालबागचा राजा'ही गुजरातला घेऊन जातील, संजय राऊतांचा हल्लाबोल - Sanjay Raut Attack On Amit Shah

ABOUT THE AUTHOR

...view details