ETV Bharat / state

राहुल गांधींचा सोमवारी परभणी दौरा; सोमनाथ सुर्यवंशीच्या नातेवाईकांची घेणार भेट - PARBHANI VIOLENCE NEWS

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी सोमवारी परभणी दौऱ्यावर येणार आहेत. या भेटीत ते न्यायालयीन कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सुर्यवंशीच्या नातेवाईकांची भेट घेणार आहेत.

Rahul Gandhi Parbhani Visit
राहुल गांधी परभणी दौरा (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 22, 2024, 7:29 AM IST

Updated : Dec 22, 2024, 7:36 AM IST

मुंबई- परभणीतील सोमनाथ सुर्यवंशी या तरुणाचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाल्याचं प्रकरण राज्यानंतर आता देशपातळीवर पोहोचणार आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे सोमवारी परभणीला भेट देणार आहेत. गेल्या आठवड्यात न्यायालयीन कोठडीत सोमनाथ सुर्यवंशी या तरुणाचा मृत्यू झाला. या तरुणाच्या नातेवाईकांची राहुल गांधी भेट घेणार आहेत.

राहुल गांधी सोमवारी दुपारी एका विशेष विमानानं नांदेडला पोहोचणार आहेत. तेथून गांधी परभणी येथेली सोमनाथ व्यंकट सुर्यवंशी या तरुणाच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करणार आहेत.

कशामुळे सोमनाथ सुर्यवंशीला झाली होती अटक? 10 डिसेंबर रोजी मानसिक आजारी असलेल्या व्यक्तीनं परभणी रेल्वे स्थानकाजवळ संविधानाच्या प्रतिकृतीची केल्यानंतर परभणीत हिंसाचार उसळला होता. परभणीमध्ये नागरिकांकडून तणावपूर्ण बंद पाळण्यात आला. बंद दरम्यान आक्रमक झालेल्या काही तरुणांनी वाहनांची तोडफोड आणि दगडफेक केली. उसळलेल्या हिंसाचारानंतर परभणी पोलिसांनी 12 डिसेंबर रोजी सूर्यवंशी याच्यासह सुमारे 300 लोकांना ताब्यात घेतले. मात्र, 72 तासानंतर सोमनाथचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला. या घटनेवरून राज्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्याचा महाविकास आघाडीनं महायुती सरकारवर आरोप केला.

सोमनाथ सुर्यवंशीच्या मृत्यूचं नेमकं कारण काय?- विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुर्यवंशीच्या मृत्यूप्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश दिले. तसेच सुर्यवंशीच्या नातेवाईकांना १० लाख रुपयांची मदत जाहीर केले. सूर्यवंशीनं छातीत दुखत असल्याची तक्रार केली होती. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, असा परभणी पोलिसांनी दावा केला. प्रत्यक्षात सुर्यवंशीच्या शवविच्छेदन अहवालात अनेक जखमा झाल्यामुळे मृत्यू झाल्याचं म्हटलं आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे पोलिसांनी सुर्यवंशीला अमानुषपणे मारहाण केल्याचा विरोधी पक्षासह काही संघटनांनी यापूर्वीच आरोप केला होता.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात काय दिली माहिती?- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूबाबत माहिती दिली. कोठडीत असताना त्याचे व्हिडीओ फुटेज उपलब्ध आहेत. त्यात त्याला मारहाण झाली नसल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. मात्र, शवविच्छेदन अहवालात त्याच्या हाडांना दुखापत झाल्याचं स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे. या संपूर्ण प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी केली जाणार आहे. परभणीमधील हिंसाचार हिंदू विरुद्ध मागासवर्गीय असा नाही. बहुसंख्य लोक शांततेने आंदोलन करत होते. काही लोकांनी हिंसक पद्धतीचा वापर केला.

हेही वाचा-

  1. संतोष देशमुख हत्याप्रकरणात बीडच्या एसपींची बदली, एसआयटीसह न्यायालयीन चौकशी- देवेंद्र फडणवीस
  2. महाराष्ट्रात गोध्रासारखा प्रकार, प्रकाश आंबेडकर यांची टीका; सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबातील एकाला सरकारी नोकरीची मागणी

Last Updated : Dec 22, 2024, 7:36 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.