महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भाजपाच्या 50 जागाही येणार नाहीत, तर एक दोन आमदार येतील म्हणून मनसेची भाजपाशी जवळीक; संजय राऊतांचा हल्लाबोल - MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024

उबाठा खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. भाजपाच्या राज्यात 50 जागाही येणार नाहीत, अशी जोरदार टोलेबाजी संजय राऊतांनी केली.

Maharashtra Assembly Election 2024
संग्रहित छायाचित्र (ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 31, 2024, 12:28 PM IST

Updated : Oct 31, 2024, 2:29 PM IST

मुंबई : भारतीय जनता पार्टीसोबत जाणाऱ्या पक्षाचा गळा कापण्यात येतो. मात्र तरीही काही पक्ष भाजपासोबत हातमिळवणी करतात. तरीही भाजपाच्या यावेळी 50 जागाही येणार नाहीत. तर आपले एक- दोन आमदार येतील, म्हणून राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना भाजपासोबत जवळीक साधत आहे, असा जोरदार हल्लाबोल उबाठा खासदार संजय राऊत यांनी केला. संजय राऊत यांनी आज सकाळी माध्यमांशी संवाद साधला, यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं.

अमित ठाकरे आमच्या परिवारातील नेते :भाजपा हा मित्रपक्षाला संपवणारा पक्ष आहे. मात्र तरीही मनसे आपला एक दोन आमदार येईल, या आशेनं भाजपासोबत जवळीक साधत आहे, जोरदार हल्लाबोल संजय राऊत यांनी केला. उद्धव ठाकरे यांचा पक्ष आणि चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घ्यायला नको होतं, या अमित ठाकरे यांच्या वक्तव्यावरही संजय राऊत यांनी भाष्य केलं. अमित ठाकरे हे आमच्या परिवारातील आहेत, असं त्यांनी यावेळी सांगितलं.

मग यांचे दीडशे आमदार असतील? : दरम्यान, पुढं बोलताना संजय राऊत म्हणाले की, "काल राज ठाकरे यांनी एक वक्तव्य केल मला माहीत नाही, त्यांनी कोणत्या दबावाखाली वक्तव्य केले आहे. पण राजकारणामध्ये असे विनोद होत असतात जर मनसे सतेत असेल आणि भाजपाचा मुख्यमंत्री असेल तर मनसेचे मग दीडशे आमदार असतील का? असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला. भाजपाचे केवळ पन्नास आमदार येतील का? असंही राऊत म्हणाले. दरम्यान, एकीकडं दिल्लीतील मोदी-शाह महाराष्ट्र हिताचं कोणतंही काम करत नाहीत. भाजपा हे महाराष्ट्र द्रोही आहे हे आपण पाहिलं आहे. महाराष्ट्रातील अनेक उद्योगधंदे मोदी-शहाणी गुजरातला पळवलं. आणि त्यांना पाठिंबा देणारं हे महायुतीचे महाराष्ट्रातील नेते आहेत. पण एका मराठी माणसाच्या हितासाठी रक्षणासाठी ज्यांनी पक्ष स्थापन केला आहे, तेच जर भाजपाला पाठिंबा देणार असतील आणि ते त्यांच्यासोबत सत्तेत सहभागी होणार असतील, तर काय बोलायचं. मनसेची सत्ता जर येत असेल तर येऊ द्या. राजकारणात प्रत्येक पक्षाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार असतो. पण राज ठाकरे यांनी ईडीच्या, सीबीआयच्या की आणखी कशाच्या दबावाखाली हे बोललेत ते माहीत नाही," असं राऊत म्हणाले.


१०५ हुतात्मांचा अपमान :गेल्या काही दिवसापासून भाजपा आणि देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांचे सुर जुळू लागले आहेत, असा प्रश्न संजय राऊत यांना विचारला. आता निवडणुकीत कुणाच्या सूर जुळत असतील तर चांगलं आहे. मात्र हेच राज ठाकरे यांनी मोदी-शाह हे देशाच्या राजकीय क्षितिजावरुन नष्ट झाले पाहिजेत, अशी भूमिका घेतली होती. मग आता असे काय झाले की राज ठाकरे यांचे सूर भाजपासोबत जुळू लागले आहेत. हे समजत नाही. मात्र जे महाराष्ट्रावर मोदी-शाह चाल करून येतात. त्यांना पाठिंबा देणं हे म्हणजे महाराष्ट्रातील 105 हुतात्म्यांचा अपमान आहे, अशी बोचरी टीका संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्यावर केली.

हेही वाचा :

  1. अजित पवार आणि फडणवीसांवर राज्यपालांनी गुन्हा नोंदवावा - संजय राऊत
  2. श्रीनिवास वनगांप्रमाणे एकनाथ शिंदेसुद्धा २६ तारखेनंतर रडतील, संजय राऊतांचा घणाघात
  3. संजय राऊत अन् नाना पटोले यांच्यात जुंपली; नेमकं कारण काय?
Last Updated : Oct 31, 2024, 2:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details