बुलढाणा Constable Fed Newborn Baby : 'सद् रक्षणाय, खल निग्रहणाय' हे ब्रीदवाक्य घेऊन लोकांच्या रक्षणार्थ पोलीस खाकी घालून आपलं कर्तव्य पार पाडत असतात. कधी-कधी पोलिसांना त्यांचा खाक्या दाखवावा लागतो. मात्र, या खाकीमध्येही शेवटी एक मनुष्य आहे. खाकीत एका वडिलाचं प्रेम, एका आईची 'ममता' लपलेली असते. याचा प्रत्यय शुक्रवारी बुलढाण्यातील एका घटनेतून आला होता.
आमदार संजय गायकवाड यांनी केलं कौतुक : अवघ्या एक दिवसाच्या भुकेल्या अनोळखी चिमुकलीला बुलढाणा शहर ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला पोलीस कर्मचारी योगिता डुकरे यांनी चक्क आपलं स्वतःचं दूध पाजून शांत केलं होतं. या महिला कर्मचाऱ्यानं केलेल्या कार्यामुळं त्यांचं कौतुक तर होतच आहे. मात्र, या प्रकारामुळं खाकीमधली ममता देखील सर्वांसमोर आली आहे. याची दखल घेत बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी बुलढाणा शहर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन महिला पोलीस कर्मचारी योगिता डुकरे यांचं कौतुक केलं आहे.
प्रतिक्रिया देताना आमदार संजय गायकवाड (ETV BHARAT Reporter) काय आहे घटना: लोणार येथून एका इसमाने एका दिवसाच्या चिमुकलीला बुलढाणा येथील अनाथ आश्रमात ठेवण्यासाठी शनिवारी (3 सप्टेंबर) रोजी आणलं होतं. परंतु अनाथ आश्रमाने पोलिसांत तक्रार नोंदवण्यास सांगितलं. दरम्यान हा इसम या चिमुकलीला त्याच दिवशी रात्रीच्या आठ ते साडेआठ वाजेच्या सुमारास बुलढाणा शहर पोलिसात तक्रार द्यायला पोहोचला होता. ही चिमुकली एका वेड्या बाईची असल्याचं सांगून ती मेली असती म्हणून तिला अनाथ आश्रमात टाकण्यासाठी आणल्याचं या इसमानं पोलिसांना सांगितलं. सकाळपासून ही एक दिवसाची चिमुकली या इसमाकडं असल्यानं ती उपाशी होती. याच कारणाने ती व्याकुळ होऊन रडत होती.
चिमुकलीला स्वतःचं दूध पाजून केलं शांत : बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीस कर्मचारी योगिता शिवाजी डुकरे यांनी या चिमुकलीला रडताना पाहताच त्यांच्यामधील 'वात्सल्यभाव' जागृत होवून त्यांना कळलं की, ही चिमुकली उपाशी आहे. त्यांनी लगेच परवानगीने या अनोळखी एक दिवसाच्या चिमुकलीला स्वतःचं दूध पाजून शांत केलं होतं. विशेष म्हणजे महिला पोलीस कर्मचारी योगिता शिवाजी डुकरे यांना एक ते दीड वर्षाचं बाळ असल्यानं त्यांना ती चिमुकली उपाशी असल्याचं लक्षात आलं होतं.
हेही वाचा -
- खाकी वर्दीलाही फुटला पान्हा! भुकेल्या बाळाला दूध पाजणारी 'हिरकणी' महिला पोलीस - constable fed newborn baby
- नवजात बालकांसाठी वरदान ठरतेय 'यशोदा मिल्क बँक', दररोज होते 8 ते 10 लिटर दुधाचे संकलन - World Breastfeeding Week 2024
- अमरावती विद्यापीठात आता 'हिरकणी कक्ष'; स्तनपान करण्यासाठी स्वतंत्र खोली