मुंबईRamoji Film City :आशियातील सर्वात मोठ्या 'ट्रॅव्हल ट्रेड शो' प्रदर्शनात हैदराबादमधील प्रसिद्ध रामोजी फिल्म सिटीचा स्टॉल आकर्षणाचं केंद्र बनलं आहे. जगातील पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी दरवर्षी मुंबईत या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात येतं. 'हे' प्रदर्शन 8 फेब्रुवारीपासून सुरू झालं असून 10 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे.
आशियातील सर्वात मोठा 'ट्रॅव्हल ट्रेड शो' :मुंबई भारतातील सर्वात मोठी आर्थिक बाजारपेठ आहे. तसंच, मुंबई भारताची आर्थिक राजधानी देखील आहे. तसंच मुंबई एक व्यावसायिक केंद्र देखील आहे. OTM मुंबई 2024 प्रदर्शनात भारतासह 60 हून अधिक देशातील 1 हजार 300 प्रदर्शकांनी सहभाग घेतला आहे. हा आशियातील सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय प्रवासी ट्रेड शो आहे. यामध्ये सर्व उद्योग क्षेत्रातील 14 हजारांहून अधिक ट्रेड अभ्यागत, 4 हजार पात्र खरेदीदार, 445 ट्रॅव्हल ट्रेड खरेदीदारांचा समावेश आहे. या ट्रॅव्हल ट्रेड शोमध्ये पर्यटन वाढवण्यासाठी देश-विदेशातील असंख्य स्टॉल्स लावण्यात आले आहेत. देश-विदेशातील पर्यटनाची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे हा या प्रदर्शनाचा उद्देश आहे.
परदेशात आल्याचा भास :यामध्ये हैदराबाद येथील रामोजी फिल्मसिटीचा स्टॉल अनेकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. येथे येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला फिल्मसिटीची सविस्तर माहिती दिली जात आहे. यावेळी रामोजी फिल्म सिटी आमचं आवडतं ठिकाण असल्याचं देशभरातील पर्यटन स्थळांचा प्रचार करणारे ट्रॅव्हल एजंट अनुराग साहू यांनी म्हटलं आहे. भुवनेश्वर ओडिशा इथं आम्ही रामोजी फिल्म सिटीचा मोठ्या प्रमाणावर प्रचार करत आहोत. रामोजी फिल्म सिटी भारतातील सर्वात छान पर्यटन स्थळांपैकी एक आहे. इथं आल्यावर परदेशात आल्यासारखं वाटतं. हैदराबादमधील फिल्म सिटी देश-विदेशातील पर्यटकांसाठी आकर्षणाचं केंद्र ठरत आहे. आम्ही या फिल्म सिटीचं मोठ्या प्रमाणावर प्रमोशनही करत आहोत, असं त्यांनी म्हटलंय.