ETV Bharat / state

ठाकरेंच्या सेनेचे मिशन मुंबई महापालिका, काय आहेत आव्हाने अन् बलस्थाने? - MUMBAI MUNICIPAL CORPORATION

मुंबई महापालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी भाजपा आणि शिंदेंची सेना यांनी आतापासूनच चांगली कंबर कसली आहे.

Uddhav Thackeray
उद्धव ठाकरे (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 25, 2024, 3:17 PM IST

मुंबई - राज्यात नुकतीच विधानसभा निवडणूक पार पडली. त्याआधी लोकसभा निवडणूक झाली. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळेल, असं भाकीत सर्वजण करीत होते. परंतु या उलट महायुतीला चांगले यश मिळाल्यानं राज्यात महायुतीचे सरकार आलंय. दरम्यान, राज्यातील कित्येक महापालिका निवडणुका दोन-तीन वर्षांपासून रखडल्या आहेत. या निवडणुका लवकरच होणार असल्याचं बोललं जातंय. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. मुंबई महापालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी भाजपा आणि शिंदेंची सेना यांनी आतापासूनच चांगली कंबर कसली आहे.

आगामी पालिका निवडणूक स्वतंत्रपणे लढवण्याचे संकेत : गेल्या 25 वर्षांपासून मुंबई पालिकेवर शिवसेना (ठाकरे गटाची) एकहाती होती. मात्र आता शिवसेनेच्या फुटीनंतर आणि विधानसभा निवडणुकीतील अनपेक्षित निकालामुळं ठाकरेंच्या शिवसेनेनं मुंबई महापालिका मिशन यावर लक्ष केंद्रित केलंय. याचाच एक भाग म्हणून गुरुवारपासून प्रभाग निहाय आणि राज्यातील विधानसभानिहाय बैठकीतून आढावा घेतला जाणार आहे. कोणत्याही परिस्थितीत आपल्या हातून मुंबई महापालिका जाऊ द्यायची नाही, या इराद्याने ठाकरेंची सेना जोरदार तयारी करीत आहे. या बैठकीत ठाकरे गटाकडून वेगवेगळी रणनीती आखली जाण्याची शक्यता असून, बैठकीतून उद्धव ठाकरे हे नेत्यांना यशाच्या कोणता कानमंत्र देणार आहेत? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. दुसरीकडे आगामी पालिका निवडणूक स्वतंत्रपणे लढवण्याचे संकेत ठाकरे गटाने दिलेत. त्यामुळं मुंबईत प्रभागनिहाय बैठकांची मालिका सुरू राहणार आहे. विशेषत: शिवसेना फुटीनंतर पालिकेवर पक्षाचे 25 वर्षांचे वर्चस्व कायम राखण्याचे, सत्ता कायम राखण्याचे आव्हान आणि ध्येय उद्धव ठाकरेंसमोर आहे.

फुटीनंतर निवडणुकीला विशेष महत्त्व : जून 2022 मध्ये मूळ शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांनी बंड करत भाजपासोबत सरकार स्थापन केले. यानंतर शिवसेनेला मोठे भगदाड पडलंय. अनेक आमदार, खासदार, नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेपर्यंत प्रवेश केलाय. ही गळती आजतागायत सुरूच आहे. शिवसेना फुटीनंतर जवळपास 60 च्यावर माजी नगरसेवकांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. आताही अनेक नगरसेवक शिंदे यांच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याचं बोललं जातंय. दरम्यान, शिवसेना फुटीनंतर पहिल्यांदाच मुंबई महापालिका निवडणूक होत असल्यामुळं 25 वर्षांची सत्ता पुन्हा एकदा आपल्याकडे काबीज करण्यासाठी उद्धव ठाकरे आणि पक्षाचा कस लागणार असल्याचं राजकीय तज्ज्ञ, जाणकार आणि विश्लेषकांनी म्हटलंय. कारण विधानसभा निवडणुकीत अपेक्षा नसतानाही शिंदेंच्या शिवसेनेला चांगले यश मिळाले. तर ठाकरेंच्या सेनेला केवळ 20 आमदार निवडून आणता आले. परिणामी शिंदेंच्या शिवसेनेचा आत्मविश्वास दुणावला असून, मुंबई महापालिका निवडणुकीत जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यावर त्यांचा भर असेल.

मुंबई महापालिका निवडणुकीत सेनेला फुटीचा फटका बसणार : लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणूक यानंतर आता महानगरपालिकेची निवडणूक ही उद्धव ठाकरेंसाठी प्रतिष्ठानची निवडणूक आणि अस्तित्वाची लढाई असणार आहे. 2017 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे 84 नगरसेवक निवडून आले होते, तर भाजपाचे 82 नगरसेवक विजयी झाले होते. विशेष म्हणजे मनसेचे सहा नगरसेवकांनीही ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे त्यांचं संख्याबळ 90 च्या घरात पोहोचलं होतं. परंतु आगामी होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना फुटीचा, शिवसेना विभाजनाचा फटका ठाकरेंच्या सेनेला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा कयास राजकीय तज्ज्ञांकडून लावला जातोय.

ठाकरेंच्या सेनेसमोंरील काय आहेत आव्हाने? : दरम्यान, शिवसेना फुटीनंतर आणि शिंदेंच्या बंडानंतर पहिल्यांदाच पालिका निवडणूक होत आहे. सध्या अनेक माजी नगरसेवक शिंदेंच्या सेनेत आहेत. त्यांना मूळ शिवसेनेत परत आणण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या सेनेला प्रयत्न करावे लागणार आहेत. मुंबईतील वॉर्डनिहाय कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेल प्रश्न आणि समस्या या सोडविण्यावर ठाकरेंच्या सेनेला भर द्यावा लागणार आहे. संघटनात्मक कौशल्य आणि संघटनात्मक बांधणी यासाठी उद्व ठाकरेंना विशेष भर द्यावी लागणार आहे. शिवसेना फुटीमुळं सेनेतील मूळ मतदार याचे विभाजन झालेय. त्यांना विश्वासात घेऊन त्या मतदारांची पुनर्बांधणी करण्याचं आव्हान ठाकरेंच्या सेनेसमोर आहे.

कार्यकर्त्यांना विश्वासात घ्यावे लागणार : मुंबईतील काही नागरी सेवा आणि समस्यांबाबत ठोस भूमिका घेत उपाययोजना आणि त्या प्रभावी राबविण्यासाठी तळागाळातील शिवसैनिक, कार्यकर्त्यांना विश्वासात घ्यावे लागेल. तळागळातील मुंबईकरांना आपल्या पक्षाला मतदान करण्यासाठी त्यांचे मन परिवर्तन करण्याचे आव्हान उद्धव ठाकरेंच्या सेनेपुढे आहे. दुसरीकडे भाजपा, शिंदे आणि अजित पवार यांनी एकत्र निवडणूक लढविल्यास आणि उद्धव ठाकरेंनी स्बबळाचा नारा देऊन स्वतंत्र्य निवडणूक लढवल्या तर त्याचा फटका उद्धव ठाकरेंना बसू शकतो. पालिकेत 25 वर्षांपासून सेनेनं मोठा भ्रष्टाचार केल्याच्या भाजपाच्या आरोपाला उद्धव ठाकरे कसे सामोरे जाणार हे देखील ठाकरेंना ठरवावे लागणार आहे.

ठाकरेंच्या सेनेसमोरील जमेची बाजू काय? : शिवसेनेच्या फुटीनंतरही मूळ शिवसैनिक हे ठाकरेंसोबतच असल्याचं बोललं जातंय. फुटीनंतर अजूनही मुंबईकरांची विश्वासार्हता ठाकरेंच्या सेनेवर असल्याचं दिसून येतंय. हे विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून स्पष्ट झालंय. मुंबईत ठाकरेंचे 10 आमदार निवडून आल्यानं मुंबईकर हे शिवसेनेला मतदान करतील, असं बोललं जातंय. आरे कारशेडला ठाकरेंच्या सेनेनं किंबहुना आदित्य ठाकरेंना केलेला विरोध हा त्यांच्या पथ्यावर पडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. उद्धव ठाकरे यांचे संघटनात्मक कौशल्य आणि संघटना बांधणी हे पक्षाच्या निवडणुकीत कामी येण्याची शक्यता आहे. शिवसेना फुटीनंतर शिवसेना पक्ष, चिन्ह याचा निर्णय न लागणे हे मुंबईकरांना पटलेलं दिसत नाही. त्यामुळं याची सहानुभूती उद्धव ठाकरेंच्या पाठीशी असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

तरीही ठाकरेंच्या सेनेला निवडणूक जड जाणार : 1996 पासून गेली 25 वर्ष भाजपासोबत शिवसेनेची पालिकेवरती सत्ता होती. या 25 वर्षांत शिवसेनेनं मोठा भ्रष्टाचार केलाय, असं विरोधी पक्ष काँग्रेसने वारंवार आरोप केलेत. मात्र आता शिवसेना फुटीनंतर उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच पालिका निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची आणि अस्तित्वाची लढाई असणार आहे. पण सध्याचे राजकीय चित्र पाहता राज्यापासून ते केंद्रापर्यंत भाजपा आणि शिंदे म्हणजे महायुतीची सत्ता आहे. विधानसभा निवडणुकीत ठाकरेंच्या सेनेला अपेक्षित यश मिळाले नाही. त्यामुळे पालिका निवडणुकीत विजय मिळवणं आणि 25 वर्षांची सत्ता पुन्हा काबिज करणं हे मोठं आव्हान उद्धव ठाकरे यांच्यासमोर असणार आहे, असं राजकीय विश्लेषक जयंत माईणकर यांनी "ईटीव्ही भारत"शी बोलताना सांगितलं. मात्र सध्याची परिस्थिती आणि पक्षीय बलाबल पाहता ही निवडणूक उद्धव ठाकरेंसाठी जड जाणार आहे. किंबहुना त्यांचा या निवडणुकीत पराभवसुद्धा होऊ शकतो, अशी शक्यता माईणकर यांनी व्यक्त केलीय. कारण उद्धव ठाकरेंना जास्त हिंदू कार्ड खेळता येणार नाही. हिंदू कार्डमुळं मुस्लिम मतदार दुखावणार आहेत. परिणामी गेल्या निवडणुकीत ठाकरेंना मतदान केलेले मुस्लिम मतदार हे ठाकरेंपासून फारकत घेण्याची शक्यता असून, त्याचा फटका ठाकरेंच्या शिवसेनेला बसू शकतो. दरम्यान, ठाकरे हे महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवतात की स्वबळाचा नारा देतात हे पाहणे महत्त्वाचे आहे. परंतु एकंदरीत सध्याची राजकीय ताकद शिंदेंच्या सेनेची आणि भाजपाची वाढलेली आहे. महायुती उद्धव ठाकरे यांना शह देऊन 25 वर्षांची सत्ता उलथवून लावू शकते. त्यामुळं आगामी पालिका निवडणूक ही नक्कीच उद्धव ठाकरेंसाठी एक मोठं आव्हान असल्याचंही माईणकर यांनी स्पष्ट केलंय.

हेही वाचा :

  1. परभणीत जाऊन राहुल गांधी यांनी विद्वेषाचं काम केलंय; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
  2. बीडमध्ये राष्ट्रपती राजवट लावावी अशी परिस्थिती; लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का, संजय राऊतांचा सवाल
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.