ETV Bharat / state

"मुंबई महापालिकेत महायुतीचाच महापौर असेल," भाजपाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत नेमकं काय घडलं? - MUNICIPAL CORPORATION ELECTION

मुंबई भाजपा अध्यक्षाबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचं आमदार अमित साटमांनी सांगितलंय. भाजपाची कोअर कमिटीची बैठक संपल्यानंतर त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

Mumbai Municipal Corporation Election
मुंबई महापालिका निवडणूक (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 25, 2024, 5:25 PM IST

Updated : Dec 25, 2024, 5:41 PM IST

मुंबई - आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षाकडून जय्यत तयारी सुरू झालीय. त्याच दृष्टीनं मोर्चेबांधणी आणि रणनीती आखण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून आज (बुधवारी) मुंबई भाजपाकडून कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत राज्य सरकारमधील मंत्री आणि भाजपाचे विद्यमान मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह मंगलप्रभात लोढा, मिहीर कोटेचा, अमित साटम, प्रवीण दरेकर आदी नेते उपस्थित होते. या बैठकीत आगामी मुंबई महापालिका निवडणुकीबाबत चर्चा झाली. मात्र मुंबई भाजपा अध्यक्षाबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याची माहिती आमदार अमित साटम यांनी दिली. भाजपाची कोअर कमिटीची बैठक संपल्यानंतर त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

सदस्य अभियान राबवणार : आगामी पालिका निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून मुंबईत 1 जानेवारी ते 15 जानेवारीपर्यंत भाजपातील सदस्य अभियान राबवलं जाणार आहे. तसंच 5 जानेवारी रोजी मुंबईतील विविध ठिकाणी भाजपाकडून बूथनिहाय टेबल लावण्यात येणार असून, मुंबईकरांमध्ये जनजागृती आणि सदस्य नोंदणी अभियान राबवलं जाणार आहे. विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीतल्या भव्य यशामुळे विश्वास दुणावलेली महायुती दीडशेपेक्षा जास्त जागा जिंकून मुंबई महापालिकेमध्ये बहुमत प्राप्त करेल आणि महायुतीचा महापौर हा मुंबईच्या महापालिकेमध्ये बसेल, असा विश्वास अमित साटम यांनी व्यक्त केलाय. मुंबई भाजपाची कोअर कमिटीची आज बैठक पार पडली. या बैठकीत आगामी पालिका निवडणुक यावर चर्चा करण्यात आलीय. येणाऱ्या पालिका निवडणुकीत मुंबई पालिकेला भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा "एक है तो सेफ आहे..." हा नारा पुढे घेऊन जाण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून, त्या दृष्टीने निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचं अमित साटम यांनी सांगितलं.

अध्यक्ष बदलण्याची चर्चा नाही : लोकसभा निवडणुकीतल्या निराशाजनक कामगिरीनंतर निराशा झटकत विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचे नेते, कार्यकर्ते जोमाने कामाला लागले. या निवडणुकीत भाजपाला चांगलं यश मिळालं. सध्या आशिष शेलार हे मुंबई भाजपा अध्यक्ष आहेत. पण शेलार यांना मंत्रिपद देण्यात आलंय. त्यामुळे भाजपाकडून मुंबई भाजपाचा अध्यक्ष बदलण्याच्या हालचाली मागील काही दिवसांपासून सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर आजच्या भाजपाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत मुंबई भाजपा अध्यक्ष बदलण्यावर काही चर्चा करण्यात आली का? असा प्रश्न अमित साटम यांना विचारला असता, आजच्या कोअर कमिटीच्या बैठकीत आगामी मुंबई महापालिका निवडणुकीबाबत चर्चा झाली, रणनीती ठरवण्यात आली. तसेच सध्याची जी आमची आकडेवारी आहे आणि ज्या ठिकाणी आमचे नगरसेवक आहेत. त्या जागांवर चर्चा करण्यात आली. मात्र मुंबई भाजपा अध्यक्ष बदलण्यात येणार आहे का? किंवा नवीन अध्यक्ष कोण होणार आहे? याबाबत बैठकीत कुठलीही चर्चा झाली नसल्याचं आमदार अमित साटम यांनी सांगितले.

हेही वाचा

  1. उपमुख्यमंत्री पदावरून मंत्री मुश्रीफांचा 'यू टर्न'; म्हणाले लोकांना उत्साहित करण्यासाठी बोललो
  2. बीडचं प्रकरण सत्ताधारी पक्षाच्या नेत्याशी निगडीत असल्यानं दाबलं जाणार का? बाळासाहेब थोरात यांचा सवाल
Last Updated : Dec 25, 2024, 5:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.