महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

संजय राऊत म्हणाले, नरेंद्र मोदी जॉनी लिव्हर तर राम कदम म्हणाले उद्धव ठाकरे असरानी का? - Sanjay Raut criticizes PM Modi - SANJAY RAUT CRITICIZES PM MODI

Sanjay Raut criticizes PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रविवार (दि. 1 एप्रिल) रोजी मुंबईत असून त्यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. (Sanjay Raut) पंतप्रधान कॉमेडी करत असून ते देशाचे जॉनी लिव्हर आहेत अशी टीका राऊत यांनी केली. तर, भाजपा आमदार राम कदम यांनी राऊत यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे.

फाईल फोटो
फाईल फोटो

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 1, 2024, 6:07 PM IST

Updated : Apr 1, 2024, 6:30 PM IST

व्हिडिओ

मुंबई :Sanjay Raut criticizes PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आरबीआय (RBI) ला 90 वर्षे पूर्ण झाल्या निमित्ताने त्याच्या खास कार्यक्रमासाठी मुंबई दौऱ्यावर होते. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्या या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. यावरून शिवसेना उबाठा गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली आहे. राऊत यांनी नरेंद्र मोदी यांची तुलना विनोदी अभिनेता जॉनी लिव्हर याच्याशी केली आहे. यावरून भाजपा नेते चांगलेच तापले असून त्यांनीही संजय राऊत यांच्यावर टीका केली असून, त्यांना धमकीवजा इशाराही दिला आहे.

जॉनी लिव्हर नंतर, दुसरे गुजरातचे लिव्हर: लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय वातावरण चांगलच तापलेलं असून, सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला जोरात आहे. रिझर्व बँक ऑफ इंडियाला 90 वर्षे पूर्ण झाल्याने एका विशेष कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर होते. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान मोदी यांचा हा दौरा होत असल्याने, त्याला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. (Sanjay Raut criticizes PM Modi) यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, नरेंद्र मोदी भ्रष्टाचाऱ्यांना सोडणार नाहीत असं म्हणतात. तर हा सर्वात मोठा विनोद मोदी रोजच करत असतात. जॉनी लिव्हर याच्यानंतर आमचं मनोरंजन करणारे गुजरातचे जॉनी लिव्हर म्हणजेच नरेंद्र मोदी असल्याची भाषा संजय राऊत यांनी वापरली आहे. संजय राऊत दररोज भाजपावर निशाणा साधत त्यांचे वाभाडे काढत आहेत. आज राऊतांनी चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना विनोदी अभिनेता जॉनी लिव्हरशी केल्याने भाजपा नेते चांगलेच संतापले आहेत. त्यांनी संजय राऊत यांच्यावर टीका करत त्यांच्या या विधानाचा निषेधही केला आहे.

महाराष्ट्रात एकही जागा येणार नाही: यावर बोलताना भाजप नेते प्रवक्ते आमदार राम कदम म्हणाले, 'अहो संजय राऊत तुम्ही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना जॉनी लिव्हर म्हणता. मग तुमचे उद्धव ठाकरे हे कोण, शोले पिक्चर मधले असरानी आहेत का? आधे इधर आओ, आधे उधर जाओ, पिछे मुडके देखो तो कोई नही. काय शब्दप्रयोग आहेत हे. ज्या मोदींनी मागच्या 10 वर्षात एकही दिवस सुट्टी घेतली नाही. गोरगरिबांची चिंता करत संपूर्ण आयुष्य या देशासाठी समर्पित केलं. (PM Modi calling him Johnny Liver) तुमची हताशा तुमची निराशा मी समजू शकतो. परंतु, इतकं वैफल्यग्रस्त विधान. याद राखा मोदींना तुम्ही जे अपशब्द वापरले आहेत, त्यासाठी महाराष्ट्रातील जनता तुम्हाला कधीही माफ करणार नाही. या निवडणुकीत महाराष्ट्रात तुमची एकही जागा निवडून येणार नाही. तुम्हाला तुमच्या विधानाचा दंड हा महाराष्ट्रातील जनताच देईल, असंही राम कदम म्हणाले आहेत.

Last Updated : Apr 1, 2024, 6:30 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details