मुंबई - सलमान खान हा बॉलिवूड चित्रपटसृष्टीतील एक असा अभिनेता आहे जो वयाच्या साठीच्या उंबरठ्यावर पोहोचूनही अविवाहित आहे. आजवर त्याच्या प्रेमप्रकरणांबद्दल अनेक बातम्या आल्या असल्या तरी, तो कोणत्याही मुलीशी लग्न करू शकला नाही. दक्षिण चित्रपटसृष्टीतही असाच एक सुपरस्टार आहे, जो ४५ वर्षांचा आहे पण अजूनही अविवाहित आहे. सध्या या साऊथ सुपरस्टारच्या लग्नाच्या बातम्या जोर धरत आहेत. अनेक सुपरहिट चित्रपट देणाऱ्या या साऊथ सुपरस्टारचे चाहते आता प्रभास कोणत्या सुंदरीशी लग्न करणार आहे याबद्दल अंदाज लावत आहेत.
दक्षिणेतील सिनेसृष्टीतील कलाकार योग्य वयात लग्न करतात आणि स्थायिक होतात. यामध्ये, अल्लू अर्जुन, राम चरण आणि ज्युनियर एनटीआर, हे सर्व प्रभासपेक्षा लहान आहेत आणि वडीलही झाले आहेत. प्रभास ४५ वर्षांचा झाला आहे, पण तो अजूनही अविवाहित आहे. असं असं तरी त्याच्या अफेअरबद्दल अनेक अफवा पसरल्या होत्या. पण तो कोणत्याही मुलीशी लग्न करू शकला नाही. त्याचा एक जुना व्हिडिओ देखील आहे, यामध्ये त्यानं स्वतः कबूल केलं आहे की अनेक मुलींनी त्याचा प्रस्ताव नाकारला आहे.
प्रभास त्याच्या लव्ह लाईफमध्ये खूप स्पष्ट आहे. त्याचं नाव अनेक अभिनेत्रींशी जोडलं गेलंय. परंतु त्यानं नेहमीच त्या अफवांचं खंडन केलं आहे. या अफवांमध्ये अनुष्का शेट्टी आणि कृती सेनॉन यांच्याबरोबरच्या डेटिंगच्या अफवांचाही समावेश आहे. अलीकडे त्यानं असंही म्हटलंय की लवकरच लग्न करण्याचा त्याचा कोणताही विचार नाही.
Prabhas's movie update came and Anushka Shetty posted on insta same day. For this reason Prabhas Anushka pair is trending again😂Even after years the stardom of this pair🔥 pic.twitter.com/8rr2WMaRye
— aish✨ (@AishTheDreamer) July 31, 2024
प्रभासचं नाव बाहुबलीतील त्याची सह-कलाकार असलेल्या अनुष्का शेट्टीबरोबर अनेकवेळा जोडलं गेलं आहे. त्यांच्या डेटिंगच्या बऱ्याच अफवा पसरल्या होत्या. दोघांनाही अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र पाहिलं गेलंय. मात्र त्यानं त्यांच्या डेटिंगच्या सर्व अफवांचं खंडन केलं आहे. प्रभास आणि अनुष्का यांनीही अनेक चित्रपट केले आहेत. चाहत्यांना या दोन्ही स्टार्सना पडद्यावर पाहणं खूप आवडतं.
Whaaaaaaattt 😯😁🥰💖...... Joo meyy soch raha hoo, voo aap log bii?!😌😹🤔🤔. #KritiSanon #Prabhas𓃵 !! #ProjectK 🪐 pic.twitter.com/F3s91EyFwe
— Jai Kiranᴿᴱᴮᴱᴸᵂᴼᴼᴰ 💎 (@Kiran2Jai) November 27, 2022
'आदिपुरुष' चित्रपटादरम्यान, प्रभासचं नाव सह-कलाकार कृती सेनॉनशी देखील जोडलं गेलं. वरुण धवननं एका शोमध्ये 'कृतीचं नाव कोणाच्या तरी हृदयात आहे' असं संकेत दिले तेव्हा दोघांची नावं एकत्र जोडण्यात आली. "एक माणूस आहे, जो मुंबईत नाही, तो सध्या शूटिंग करत आहे आणि तेही दीपिकाबरोबर", असं वरुण धवन म्हणाला होता. तेव्हापासून कृती सेनॉन आणि प्रभास डेटिंग करत असल्याच्या अफवा पसरू लागल्या होत्या. कृती सेनॉननं नंतर सांगितलं की वरुण धवननं या अफवा सुरू केल्या.