नागपूर- राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनीहिट ॲन्ड रन प्रकरणावरून सोशल मीडियावर पोस्ट करत धक्कादायक आरोप केले आहेत. या आरोपानंतर कल्याणीनगर अपघाताला पुन्हा राजकीय वळण लागण्याची शक्यता आहे.
माजी गृहमंत्री तथा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अनिल देशमुख यांनी कल्याणीनगर अपघाताबाबत एक्स मीडियावर पोस्ट केली. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले की, "राजकीय दबावाखाली आरोपीचे रक्ताचे नमुने बदलून आरोपी दारू न पिल्याचा अहवाल तयार करण्याचे प्रयत्न झाले. हे उघड झालं आहे. आता माजी गृहमंत्री म्हणुन माझी माहिती अशी आहे की, मृतकांच्या व्हिससेरा रिपोर्टमध्ये अल्कोहल पॉझिटिव्ह यावे, याकरिता पूर्णपणे तयारी झाली आहे. त्यामुळे मृत झालेले मोटरसायकलवरील तरुण-तरुणी हे दारु पिऊन होते. त्यांच्यामुळेच हा अपघात झाला, असे न्यायालयात सिद्ध करता येईल. जेणेकरून विशाल अग्रवालचा मुलगा लवकर सुटेल, असे सध्या प्रयत्न सुरू असल्याचा आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला.
पुणे अपघात प्रकरणात आतापर्यंत काय घडलं?
विधीसंघर्षग्रस्त बालकाचा बालनिरीक्षक गृहातील मुक्काम वाढला-कल्याणीनगर अपघात प्रकरणातील विधीसंघर्षग्रस्त बालकाचा मुक्काम 25 जूनपर्यंत बालनिरीक्षक गृहातच असणार आहे. बुधवार बालन्याय हक्क मंडळात झालेल्या सुनावणीत न्यायालयानं त्या विधीसंघर्षग्रस्त बालकाला 25 जूनपर्यंत बालनिरीक्षक गृहातच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कल्याणीनगर येथील अपघात प्रकरणातील त्या अल्पवयीन मुलाचा बालसुधारगृहातील मुक्काम बुधवारी संपला. त्याला बालन्याय हक्क मंडळात हजर करण्यात आलं होत. यावेळी झालेल्या सुनावणीत 25 जुनपर्यंत त्या अल्पवयीन मुलाला बाल सुधारगृहात ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
विधीसंघर्षग्रस्त बालकाचाचे समुपदेशन सुरू-विधीसंघर्षग्रस्त बालकालाबालसुधारगृहातून घरी सोडण्यास पोलिसांनी विरोध केला. बचाव पक्ष्याकडून विधीसंघर्षग्रस्त बालकाला घरी सोडण्याची विनंती करण्यात आली. पोलिसांनी विधीसंघर्षग्रस्त बालकाला 14 दिवस बालसुधार ठेवावे अशी मागणी केली आहे. विधीसंघर्षग्रस्त बालकालाचे समुपदेशन सुरू आहे. विधीसंघर्षग्रस्त बालकालाची घरी रवानगी झाल्यास तपासात अडथळा निर्माण होऊ शकतो, असा सरकारी वकिलांनी युक्तीवाद केला. विधीसंघर्षग्रस्त बालकाचे आई, वडील, आजोबा अटकेत असल्याचे समजल्यास त्याचा मनावर त्याचा परिणाम होऊ शकतो. विधीसंघर्षग्रस्त बालकाची घरी रवानगी झल्यास नातेवाईकांच्या मदतीने पुरावे नष्ट करण्याचीदेखील शक्यता आहे, असा पोलिसांच्या वकिलांनी युक्तीवाद केला. या युक्तीवादानंतर बालहक्क न्याय मंडळाने त्या विधीसंघर्षग्रस्त बालकाला 25 जूनपर्यंतच बालनिरीक्षक गृहातच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
लाचखोरीचा सीसीटीव्ही सापडला-पोर्शे कार अपघातात सहभागी असलेल्या विधीसंघर्षग्रस्त बालकाचाच्या रक्ताचे नमुने बदलून देण्याच्या प्रकरणात लाचखोरी झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणी कसून तपास करणाऱ्या पोलिसांना ससून जनरल हॉस्पिटलमधील एका कर्मचाऱ्याचे सीसीटीव्ही फुटेज सापडले आहे. येरवडा परिसरात रेकॉर्ड करण्यात आलेल्या या फुटेजमध्ये अश्पाक मकानदार हा रुग्णालयातील कर्मचारी अतुल घाटकांबळेला पैसे देताना दिसत असल्याचे गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याने सांगितले. यापूर्वीच पोलिसांनी अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलण्याच्या प्रकरणात मकानदार आणि घाटकांबळे यांना अटक केली. अल्पवयीन मुलाच्या वडिलांनी रक्ताचे नमुने बदलण्यासाठी डॉ. श्रीहरी हलनोर याला अडीच लाख तर घाटकांबळे याला 50 हजार रुपये दिल्याचा पोलिसांनी आरोप केला.
हेही वाचा-
- डॉक्टर, पोलिसानंतर आता बालहक्क न्याय मंडळातील सदस्यही चौकशीच्या फेऱ्यात, काय आहे कारण? - Pune car accident case
- पुणे हिट अँड रन प्रकरणी 'त्या' अपघातस्थळी युवक काँग्रेसकडून निबंध स्पर्धा - Essay Competition On Pune Accident
- पुणे हिट अँड रन प्रकरण : आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार, ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांना अटक, पोलीस कोठडीत रवानगी - Pune Hit And Run Case