मुंबई- बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात कारवाईची मागणी लावून धरणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषदेत धक्कादायक आरोप केले आहेत. मंत्री धनंजय मुंडे, पंकजा मुंडे आणि वाल्मिक कराडच्या कार्यकर्त्यांकडून धमक्या मिळत असल्याची त्यांनी माहिती दिली.
- सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आपला मानसिक छळ सुरू असल्याची माहिती दिली. त्याबाबत भेटीसाठी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडं दमानिया यांनी वेळदेखील मागितली आहे.
काय म्हणाल्या अंजली दमानिया?- सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बीडमधून सतत फोन येत असल्याची पत्रकार परिषदेत माहिती दिली. त्या म्हणाल्या, " धनंजय मुंडे, पंकजा मुंडे यांच्याकडून वंजारी समाजाचा वापर होतो आहे. माझा मानसिक छळ सुरू आहे. मी कधीही कुठल्याही समाजाविरोधात नव्हते. तुकाराम मुंडे यांच्यासारखे चांगले अधिकारीदेखील आहेत. मला भगवान बाबा नेहमीच आदरणीय आणि वंदनीय आहेत. मात्र, अख्खी फौज माझ्या मागं लावण्यात आली आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांकडून माझ्यावर सोशल मीडियात खालच्या दर्जातील टीका करण्यात येत आहे. नरेंद्र सांगळेकडून सतत फोन करण्यात येत आहे. त्यानं सोशल मीडियात माझा नंबर शेअर केला आहे. सुनील फड या व्यक्तीनं मॉरिशिअसमधील माझा फोटो टाकत अश्लील लिहिलं आहे. मला आलेल्या प्रत्येक फोनची चौकशी व्हावी. पहिल्या दिवशी सातशे ते आठशे कॉल आले होते".
एसआयटी चौकशी म्हणजे धुळे-पुढे दमानिया यांनी म्हटलं, " बीडमधील बिंदू नामावलीची यादी राज्य सरकारनं जाहीर करावी, अशी माझी मागणी आहे. राज्य सरकारकडून सीआयडी आणि एसआयटी चौकशी म्हणजे केवळ धुळफेक सुरू आहे. वाल्मिक कराडला नमस्कार घालणारे पोलीस कसे चौकशी करणार? त्यामुळे या प्रकरणाची राज्याबाहेर चौकशी करावी. अन्यथा राज्यभरात आंदोलन करण्यात येणार आहे. मंत्रालयावर मोर्चा काढण्यात येईल".
हेही वाचा-