मुंबई - दरवर्षी 14 फेब्रुवारी हा दिवस प्रेमी युगुलांसाठी खास दिवस असतो. व्हॅलेंटाईन डे या दिवशी साजरा केला जातो. व्हॅलेंटाईन डे हा प्रेमाचा दिवस म्हणूनही ओळखला जातो. भारतात व्हॅलेंटाईन डे साजरा करण्याची सुरुवात 1992 च्या सुमारास झाली. त्यानंतर हा एक ट्रेंड सुरू झाला. व्हॅलेंटाईन डे हा दिवस अमेरिकेत सेंट व्हॅलेंटाईनच्या स्मृतिप्रीत्यर्थ साजरा केला जात होता. यानंतर इंग्लंडमध्ये साजरा करण्यात आला. तसेच हळूहळू हा दिवस जगभरात साजरा केल्या जाऊ लागला. अनेक देशांमध्ये या दिवसाचे वेगवेगळे नाव आहे. आज या विशेष प्रसंगी तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर मराठी चित्रपट पाहूण हा दिवस साजरा करू शकता.
1 'सैराट' चित्रपट : 'सैराट' चित्रपटाची कहाणी आर्ची आणि पार्श्या या दोन प्रेमी युगुलांच्या प्रेमाभोवती फिरणारी आहे. आर्ची ही एका श्रीमंत कुटुंबातील एक दृढ इच्छाशक्ती असलेली मुलगी असते. तसेच पार्श्या हा कनिष्ठ जातीचा कष्टाळू मुलगा असून तो आर्चीच्या प्रेमात पडतो. सामाजिक रूढी आणि कुटुंबाच्या विरोधाविरुद्ध जाऊन ते दोघेही विवाह करतात, यानंतर या कहाणीचा अंत खूप भयानक होतो. या चित्रपटाचं दिग्दर्शन नागराज मंजुळे यांनी केलं आहे. 'सैराट' चित्रपटात रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर हे कालाकर मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट 'झी 5' उपलब्ध आहे.
2 मुंबई-पुणे-मुंबई चित्रपट : या चित्रपटात एक आत्मविश्वासू मुंबईची मुलगी भावी वराला भेटण्यासाठी पुण्याला येते. जेव्हा ती काही स्थानिक मुलाला रस्ता विचारते, तेव्हा एक मुलगा तिला रस्ता सांगतो, यानंतर ते दोघेही एक दिवस एकत्र घालवतात. फिरत असताना दोघेही प्रेमाबद्दल संवाद करतात, यानंतर हे दोघेही प्रेमात पडतात. या चित्रपटामध्ये स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे या कलाकारांनी मुख्य भूमिकेत काम केलं आहे. 'मुंबई-पुणे-मुंबई' चित्रपटाचं दिग्दर्शन सतीश राजवाडे यांनी केलं आहे. हा चित्रपट तुम्ही अमेझॉन प्राइम व्हिडिओवर पाहू शकता.
3) मितवा चित्रपट : या चित्रपटात शिवम हा एक यशस्वी हॉटेल मालक आहे, जो प्रेमावर विश्वास ठेवत नाही. जेव्हा त्याच्या आयुष्यात नंदिनी नावाची मुलगी येते, तेव्हा सर्वकाही बदलते. या चित्रपटात स्वप्नील जोशी, सोनाली कुलकर्णी आणि प्रार्थना बेहेरे यांनी मुख्य भूमिकेत काम केलं आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन स्वप्ना वाघमारे जोशी यांनी केलं आहे. हा चित्रपट अमेझॉन प्राइम व्हिडिओवर उपलब्ध आहे.
4) टाइमपास चित्रपट : 'टाइमपास' हा चित्रपट अतिशय मनोरंजक आहे. या चित्रपटात दगडू हा एक सामान्य कुटुंबामधील खोडकर मुलगा, जो प्राजक्ताच्या प्रेमात पडतो. प्राजक्ता ही एक साधी आणि सुसंस्कृत मुलगी आहे. या दोघांच्या निष्पाप प्रेमकथेला एक वेदनादायक वळण लागते, जेव्हा तिचे कडक पालक या दोघांना वेगळे करतात. या चित्रपटामध्ये भालचंद्र कदम, वैभव मांगले, भूषण प्रधान आणि उर्मिला कोठारे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन रवि जाधव यांनी केलंय.
5) टाईम प्लीज चित्रपट : 'टाईम प्लीज' या चित्रपटाची कहाणी तुम्हाला खूप आवडेल. या चित्रपटात 24 वर्षांची अमृता, एक स्पष्टवक्ता महिला आहे, ती हृषी नावाच्या एका प्रौढ पुरूषाशी लग्न करते. यानंतर त्यांना त्यांच्यातील फरक जाणवू लागतात. यानंतर देखील ते त्यांचे नाते टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करतात. या चित्रपटात उमेश कामत, प्रिया बापट, सई ताम्हणकर, सिद्धार्थ जाधव, वंदना गुप्ते, सीमा देशपांडे आणि माधव अभ्यंकर यांनी मुख्य भूमिका केल्या आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन समीर संजय विध्वंस यांनी केलंय. हा चित्रपट अमेझॉन प्राइम व्हिडिओवर तुम्ही पाहून आपला दिवस साजरा करू शकता.