मुंबई - अभिनेता महेश मांजरेकर, रेणुका शहाणे, सुबोध भावे, सिद्धार्थ बोडके यासारख्या दमदार स्टारकास्ट असलेल्या चित्रपटाची निर्मिती लव फिल्म्स करीत आहे. लव फिल्म्स ही निर्माते-दिग्दर्शक लव रंजन यांची निर्मितीसंस्था असून त्यांनी अनेक बॉलिवूड चित्रपटांची निर्मिती केली आहे. 'देवमाणूस' हा त्यांची पहिली मराठी निर्मिती असून नुकताच या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटाचं टीझर लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित आणि विकी कौशल अभिनित 'छावा' या भव्य दिव्य ऐतिहासिक चित्रपटाबरोबर महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये दाखविण्यात येणार आहे. त्यामुळे 'देवमाणूस'ला मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकसंख्या मिळण्याची शक्यता आहे.
तेजस प्रभा विजय देऊस्कर चित्रपटाबद्दल केल्या व्यक्त भावना : 'देवमाणूस' या चित्रपटाचे दिग्दर्शन तेजस प्रभा विजय देऊस्कर यांनी केलं आहे. या चित्रपटाबद्दल आपले मत व्यक्त करताना त्यांनी म्हटलं की, "हा चित्रपट माझ्यासाठी एक अनोखा अनुभव ठरला आहे. प्रेक्षकांना एका वेगळ्या दुनियेत घेऊन जाणारा हा चित्रपट आहे. यातील पात्रांनी आणि कथानकानं मला स्वतःला भारावून टाकलं आणि आता प्रेक्षकांनीही हा अनुभव घ्यावा, अशी माझी इच्छा आहे."
'देवमाणूस'ची स्टार कास्ट : 'देवमाणूस' हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे. या चित्रपटाचं अलीकडेच एक पोस्टर रिलीज करण्यात आलं होतं. या चित्रपटाचं पोस्टर पाहून अनेकांनी या चित्रपटाचं कौतुक केलं होतं. 'देवमाणूस'चं 13 फेब्रुवारी रोजी टीझर रिलीज करण्यात आलं. आता या चित्रपटाचं टीझर अनेकांना आवडलं आहे. 'देवमाणूस' रिलीज होण्यापूर्वीचं रसिक हा चित्रपट जबरदस्त हिट होईल असं म्हणताना दिसत आहेत. या चित्रपटामध्ये महेश मांजरेकर, रेणुका शहाणे, सुबोध भावे आणि सिद्धार्थ बोडके यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
'देवमाणूस'चा टीझर रिलीज : 'देवमाणूस'च्या टीझरमध्ये महेश मांजरेकर वारकऱ्याची भूमिकेत आहे. त्यांच्या पत्नीच्या भूमिकेत रेणुका शहाणे असल्याची दिसत आहेत. तसेच पोलीस इन्सपेक्टरच्या भूमिकेत सुबोध भावे आहे. टीझरमध्ये असं दाखविण्यात आलं आहे की, महेश मांजरेकर यांच्या कुटुंबावर काहीतरी संकट येते. या संकटावर मार्ग काढण्यासाठी महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे काहीतरी तोडगा काढतात. 'देवमाणूस'च्या टीझर हा उत्साह निर्माण करणार आहे. या चित्रपटाची कहाणी कशाप्रकारची असेल हे काही दिवसात कळेल. महेश मांजरेकर पहिल्यांदाच वारकरीच्या भूमिकेत दिसणार आहे.
'देवमाणूस'चा टीझर पाहून चाहते झाले प्रभावित : 'देवमाणूस' हा चित्रपट रुपेरी पडद्यावर 25 एप्रिल 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे. तेजस देऊस्कर दिग्दर्शित आणि लव रंजन आणि अंकुर गर्ग निर्मित मल्टीस्टारर मराठी चित्रपट 'देवमाणूस'मध्ये महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे यांची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री पाहणं महत्त्वाची असेल. महेश मांजरेकर यांनी देखील त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर या चित्रपटाचं टीझर शेअर केलं आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं, 'एक चूक.. एक निर्णय.. आणि उरतो फक्त संघर्ष! पश्चात्ताप की प्रायश्चित्त? लव फिल्म्सच्या मल्टीस्टारर 'देवमाणूस'चा टिझर सादर आहे. 25 एप्रिल पासून 'देवमाणूस' आपल्या जवळच्या चित्रपटगृहात!' दरम्यान या पोस्टवर एका चाहत्यानं लिहिलं, 'वाह! मस्त..वाट पाहत आहोत..' दुसऱ्या एकानं लिहिलं, 'महेश मांजरेकर चित्रपट नेहमीच चांगले असतात.' आणखी एकानं लिहिलं, 'खूप जबरदस्त' आता हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये चांगलीच धुम करेल असं सध्या दिसत आहे.