हैदराबाद : भारतात लहान SUV ला सर्वाधिक मागणी आहे. महिंद्रा अँड महिंद्रा, टाटा मोटर्स, मारुती सुझुकी आणि ह्युंदाई मोटर सारख्या कंपन्याच्या SUV ला देशात सर्वाधिक मागणी आहे. मात्र, महिंद्रानं गेल्या वर्षी XUV300, XUV 3XO चं अपडेटेड मॉडेल लाँच केलं होतं. लाँच झाल्यापासून, या कारला बाजारात चांगली मागणी आहे. गेल्या जानेवारीमध्ये, महिंद्रा XUV 3XO ची विक्री 75 टक्क्यांनी वाढलीय.
किती युनिट्सची झाली विक्री
गेल्या महिन्यात महिंद्रा XUV 3XO च्या एकूण 8454 युनिट्स विकल्या गेल्या आहेत. 2024 मध्ये विकल्या गेलेल्या 4817 युनिट्सच्या तुलनेत ही संख्या 75.50 टक्क्यांनी जास्त आहे. गेल्या महिन्यात 4 मीटरपेक्षा कमी लांबीच्या विकल्या गेलेल्या एकूण कॉम्पॅक्ट SUV मध्ये XUV 3XO चा बाजार हिस्सा 7.90 टक्के होता आणि या विभागातील टॉप 10 कारमध्ये ती सहाव्या क्रमांकावर होती. गेल्या महिन्यात, महिंद्रा XUV 3XO नं Kia Sonet, Hyundai Exter, Ciaz आणि Toyota Urban Cruiser, Tigor सारख्या SUV ला मागं टाकलंय.
महिंद्रा XUV 3XO किंमत आणि तपशील
महिंद्रा XUV 3XO चे एकूण 25 प्रकार पेट्रोल आणि डिझेल इंजिन पर्यायांमध्ये विकले जातात. या कारच्या एक्स-शोरूम किंमती 7.99 लाख रुपयांपासून ते 15.56 लाख रुपयांपर्यंत आहेत. या 5 सीटर एसयूव्हीमध्ये 1197 सीसी पेट्रोल इंजिन आणि 1498 सीसी डिझेल इंजिन आहे. जे अनुक्रमे 109.96 बीएचपी पॉवर, 200 एनएम टॉर्क, 128.73 बीएचपी पॉवर आणि 300 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. ही एसयूव्ही 6-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्यायांसह येते.
हे वाचलंत का :