महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'माझं वजन 100 ग्रॅमने वाढलं कारण...' विनेश फोगाटचा मोठा खुलासा - Paris Olympic 2024

Vinesh Phogat : 100 ग्रॅम वजनामुळे विनेश फोगाटला फायनल सामन्यात मुकावं लागलं. रौप्यपदक मिळावं यासाठी तिने क्रीडा लवादाच्या न्यायालयात धाव घेतली आहे. विनेश फोगटने तिचं वजन का वाढलं हे सांगितलं. वाचा संपूर्ण बातमी...

Vinesh Phogat
Vinesh Phogat (Source - Etv Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 12, 2024, 10:47 PM IST

Updated : Aug 12, 2024, 10:54 PM IST

नवी दिल्ली Vinesh Phogat : स्टार महिला कुस्तीपटू विनेश फोगाट हिनं ऑलिम्पिक 2024 च्या अंतिम सामन्यापूर्वी अपात्र ठरवल्यानंतर क्रीडा लवादाच्या न्यायालयात (CAS) अपील केलं आहे. अंतिम फेरीत पोहोचल्यामुळे रौप्यपदक तरी देण्यात यावं, अशी मागणी तिनं केली आहे. दरम्यान एक मोठा खुलासा समोर आला आहे.

वजन वाढण्याचं कारणं : विनेश फोगटने सांगितलं की, "स्पर्धांमधील व्यस्त वेळापत्रकामुळे मला वजन कमी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही. त्यामुळे स्पर्धेच्या पहिल्या दिवसानंतर 52.7 किलोचा टप्पा मी गाठला होता. मला कोणताही स्पर्धात्मक फायदा मिळाला नाही. कारण माझे दुसऱ्या दिवशी सकाळी अतिरिक्त 100 ग्रॅम वजन होतं. पहिल्या दिवशी तीन सामने खेळले. त्याचा परीणाम माझ्या शरीरावर झाला. हेच वजन वाढण्याचं खरं कारणं आहे."

वकीलांची प्रतिक्रिया : "100 ग्रॅम वजनाची वाढ जवळजवळ नगण्य आहे. हे उन्हाळ्याच्या हंगामात शरीरावर सूज येण्यामुळे होऊ शकते. कारण उष्णतेमुळे शरीरात जास्त पाणी साचतं. याशिवाय, हे वाढलेल्या स्नायूंच्या वस्तुमानामुळेदेखील असू शकतं." विनेश एकाच दिवसात तीन सामने खेळली होती. विनेश फोगटच्या वकिलांनीही फसवणूक आणि हेराफेरीची शक्यता पूर्णपणे नाकारली आहे. यासोबतच जास्त खाल्ल्यानं वजन वाढतं, हा तर्कही त्यांनी फेटाळून लावला आहे. विनेश फोगटचं वजन हे फायनलपूर्वी 100 ग्रॅमने जास्त होतं. त्यामुळे तिला फायनलमध्ये खेळता आलं नाही. पण अंतिम फेरीत पोहोचल्यामुळे रौप्यपदक तरी देण्यात यावं, अशी मागणी तिनं क्रीडा लवादाच्या न्यायालयाकडे केली आहे. त्यामुळे आता या मागणी वर काय निकाल येणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

हेही वाचा

  1. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कुस्तीत खासदारानं जिंकलं 'कांस्यपदक'; टोकियो आणि रिओ ऑलिम्पिकमध्येही जिंकली आहेत पदकं - Paris Olympic 2024
  2. विनेश फोगटच्या आधी 'या' खेळाडूला CAS कोर्टातून मिळाला न्याय; अमेरिकन खेळाडूकडून जिंकलं 'कांस्यपदक' - paris olympic 2024
  3. अफगाणिस्तानच्या राशिद खानला 'निवृत्त' झालेल्या फलंदाजानं 'धुतलं'; षटकातील प्रत्येक चेंडूवर मारला 'सिक्स', पाहा व्हिडिओ - 5 sixes against Rashid Khan
  4. पॅरिस ऑलिम्पिकची आज 'क्लोजिंग सेरेमनी'; भारतात कधी, कुठे आणि कसे पाहता येणार लाईव्ह? - Paris Olympics Closing Ceremony
Last Updated : Aug 12, 2024, 10:54 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details