लखनऊ : लग्नावरुन परतणाऱ्या डॉक्टरांच्या कारला आग्रा लखनऊ एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात झाला. या अपघातात 4 डॉक्टरांचा मृत्यू झाल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना बुधवारी पहाटे आग्रा लखनऊ एक्सप्रेस वेवर तिरवा कोतवाली परिसरात घडली. या अपघातात डॉ अनिरुद्ध वर्मा, डॉ संतोष कुमार मौर्य, डॉ जयवीर सिंह, डॉ अरुण कुमार, डॉ नरदेव अशी या अपघातात मृत झालेल्या डॉक्टरांची नावं आहेत. हे सगळे डॉक्टर सैफई वैद्यकीय विद्यापीठाचे डॉक्टर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या घटनेत एक डॉक्टर गंभीर जखमी असून त्याला सैफई वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
सैफई रुग्णालयातील 5 जणांचा अपघातात मृत्यू : लखनऊ इथं एका लग्नासाठी सैफई इथं गेले होते. लग्नावरुन परत येताना आग्रा लखनऊ एक्सप्रेस वेवर या डॉक्टरांच्या कार चालकाचं नियंत्रण गाडीवरील नियंत्रण सुटलं. त्यामुळे तिरवा कोतवाली परिसरात भरधाव कार दुभाजक तोडून दुसऱ्या बाजुला जाऊन धडकली. या अपघातात कारमधील 5 जणांचा मृत्यू झाला, अशी माहिती सूत्रांनी दिली. तर कारमधील एकजण गंभीर जखमी झाला आहे. गंभीर जखमी झालेल्या तरुणाला सैफई वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलं आहे.
लग्नावरुन परतणाऱ्या डॉक्टरांवर काळाचा घाला : सैफई वैद्यकीय विद्यापीठातील डॉ अनिरुद्ध वर्मा, डॉ संतोष कुमार मौर्य, डॉ जयवीर सिंह, डॉ अरुण कुमार, डॉ नरदेव हे डॉक्टर कारनं लखनऊ इथं लग्नासाठी गेले होते. मात्र लग्नावरुन परत लखनऊला परत येताना आग्रा लखनऊ एक्सप्रेस वेवर तिरवा कोतवाली इथं कारचालकाचं नियंत्रण सुटल्यानं कारचा भीषण अपघात झाला. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी नागरिकांनी तत्काळ पोलिसांना पाचारण केल्यानं पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केलं. डॉ अनिरुद्ध वर्मा, डॉ संतोष कुमार मौर्य, डॉ जयवीर सिंह, डॉ अरुण कुमार, डॉ नरदेव यांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. तर डॉ जयवीर सिंग यांना गंभीर अवस्थेत सैफई वैद्यकीय महाविद्यालयात रेफर करण्यात आलं आहे. कन्नौज इथले डॉ भीम राव आंबेडकर वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सीपी पाल यांनी सांगितलं की, "पहाटे 5 जणांना आणण्यात आलं होते. त्यापैकी 4 जणांची ओळखपत्रे सापडली असून हे सर्व डॉक्टर आहेत. दुसऱ्याची ओळख पटलेली नाही. जखमी झालेल्या एका डॉक्टरला सैफई मेडिकलमध्ये पाठवण्यात आलं आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतांची ओळख पटवली आहे. त्यांच्या सर्व कुटुंबीयांना माहिती दिली. मृतांमध्ये एक मृत डॉक्टर कन्नौजचा रहिवासी आहे," असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
हेही वाचा :