बुलावायो PAK Beat ZIM by 10 Wickets : पाकिस्तान क्रिकेट संघानं दुसऱ्या वनडे सामन्यात झिम्बाब्वेचा 10 गडी राखून दारुण पराभव केला. या सामन्यात पाकिस्तान संघाची प्रत्येक चाल बरोबर होती. गोलंदाज आणि फलंदाजांनी संघासाठी अप्रतिम कामगिरी केली. झिम्बाब्वेनं पाकिस्तानला विजयासाठी 146 धावांचं लक्ष्य दिलं होतं, जे सॅम अयुबच्या झंझावाती शतकामुळं पाकिस्ताननं सहज गाठलं. अयुबशिवाय अब्दुल्ला शफीकनं 32 धावांचं योगदान दिलं.
]Saim Ayub smashes unbeaten 💯 as Pakistan draw level in the ODI series 💥#ZIMvPAK: https://t.co/yqnhEa1aL9 pic.twitter.com/HkADq4euT4
— ICC (@ICC) November 26, 2024
अवघ्या 53 चेंडूत केलं शतक : सॅम अयुबनं डावाच्या सुरुवातीपासूनच लयीत दिसला आणि झिम्बाब्वेच्या गोलंदाजांवर त्यानं आक्रमण कायम ठेवलं. त्याच्यासमोर प्रतिस्पर्धी संघाचे गोलंदाज टिकू शकले नाहीत. त्यानं झपाट्यानं धावा केल्या आणि अवघ्या 53 चेंडूत शतक पूर्ण करुन आपल्या वनडे कारकिर्दीतील पहिलं शतक झळकावलं. वनडे क्रिकेटमध्ये पाकिस्तानसाठी सर्वात जलद शतक झळकावणारा तो तिसरा फलंदाज ठरला आहे. त्याच्या पुढं फक्त शाहिद आफ्रिदी आहे.
CENTURY OFF JUST 5️⃣3️⃣ BALLS 🎉@SaimAyub7 slams the joint third-fastest 💯 for Pakistan in ODIs 💥#ZIMvPAK | #BackTheBoysInGreen pic.twitter.com/fdWY317TTu
— Pakistan Cricket (@TheRealPCB) November 26, 2024
पाकिस्तानसाठी वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक झळकावणारे फलंदाज :
- शाहिद आफ्रिदी - 37 चेंडू, विरुद्ध श्रीलंका
- शाहिद आफ्रिदी - 45 चेंडू, विरुद्ध भारत
- शाहिद आफ्रिदी - 53 चेंडू, विरुद्ध बांगलादेश
- सॅम अयुब- 53 चेंडू, विरुद्ध झिम्बाब्वे
- शर्जील खान - 61 चेंडू, विरुद्ध आयर्लंड
The @SaimAyub7 storm helps Pakistan cruise to an emphatic 🔟-wicket win in the second ODI! 🙌
— Pakistan Cricket (@TheRealPCB) November 26, 2024
The series decider will take place on Thursday 🏏#ZIMvPAK | #BackTheBoysInGreen pic.twitter.com/73srWTUF5H
सॅम अयुबनं रचला इतिहास : झिम्बाब्वेविरुद्ध सॅम अयुबनं 62 चेंडूंत 17 चौकार आणि तीन षटकारांसह 113 धावा केल्या. त्याच्यामुळं पाकिस्तानी संघ सामना जिंकण्यात यशस्वी ठरला आणि मालिकेत 1-1 अशी बरोबरीही साधली. पाकिस्तानला पहिला वनडे सामना 80 धावांनी गमवावा लागला होता. संघाची धावसंख्या 150 धावांपेक्षा कमी असताना शतक झळकावणारा सॅम आयुब हा वनडे क्रिकेटमधील पहिलाच फलंदाज ठरला आहे. त्याच्याआधी वनडेमध्ये संघाच्या 150 धावांमध्ये एकाही फलंदाजाला शतक झळकावता आलं नव्हतं. या प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेने 145 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानने 148 धावा केल्या आणि सामना जिंकला.
1️⃣1️⃣3️⃣ not out
— Pakistan Cricket (@TheRealPCB) November 26, 2024
6️⃣2️⃣ balls
1️⃣7️⃣ fours
3️⃣ sixes@SaimAyub7's whirlwind maiden ODI 💯 earns him the player of the match award 🏆#ZIMvPAK | #BackTheBoysInGreen pic.twitter.com/sI3s0f1XpJ
2024 मध्ये वनडे पदार्पण : सॅम अयुबनं 2024 साली पाकिस्तानकडून वनडेमध्ये पदार्पण केलं. यानंतर त्याने आतापर्यंत 7 वनडे सामन्यांमध्ये एकूण 436 धावा केल्या आहेत. त्यानं पाकिस्तान संघासाठी 6 कसोटी आणि 23 आंतरराष्ट्रीय T20 सामनेही खेळले आहेत.
हेही वाचा :