डरबन SA vs SL 1st Test Live Streaming : दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघात दोन सामन्यांची मालिका सुरु होत आहे. यातील पहिला सामना आजपासून किंग्समीड, डरबन इथं खेळवला जाईल. दोन्ही संघांदरम्यान रोमांचक सामना होण्याची शक्यता आहे.
International Test Cricket is back on home soil!🇿🇦🏏
— Proteas Men (@ProteasMenCSA) November 18, 2024
Get ready, as our Proteas will be hosting Sri Lanka in a 2-match Test Series between 27 November and 9 December!🏟️🇱🇰🏆
Get your tickets on the CSA website at https://t.co/qMKjaITfWt NOW!🎟️#WozaNawe #BePartOfIt#SAvSL pic.twitter.com/IQQ5iWyj2N
WTC अंतिम सामन्यासाठी प्रबळ दावेदार : दोन्ही संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीसाठी दावेदार आहेत. WTC पॉंईंट टेबलमध्ये श्रीलंका सध्या तिसऱ्या स्थानावर आहे. तर आफ्रिका संघ त्यांच्या मागे आहे. सध्या आघाडीवर असलेल्या भारत आणि ऑस्ट्रेलियाला पराभूत करुन नेत्रदीपक विजयाची नोंद करण्याचं दोन्ही संघांचं लक्ष्य आहे. श्रीलंकेचा डर्बनमधील किंग्समीड इथं मजबूत रेकॉर्ड आहे, त्यांनी कधीही कसोटी सामना गमावला नाही. यावेळी, पाहुण्या संघानं शानदार गोलंदाजी आणि यंदाच्या वर्षी शानदार सहा विजयी मालिका साकारल्या आहेत. दुसरीकडे, आफ्रिकेनं वेस्ट इंडिज आणि बांगलादेशविरुद्ध मालिका जिंकून 2010 पासून केवळ दोन कसोटी सामने जिंकूत डरबनमध्ये संघर्ष केला आहे.
Mzansi, brace yourselves for test cricketing action coming to our shores, as the Proteas take on Sri Lanka in an explosive 2-match Test Series 🇿🇦vs🇱🇰!
— Proteas Men (@ProteasMenCSA) November 21, 2024
The stakes couldn’t be higher, as both nations look to gain ground in the World Test Cricket rankings to make the final next… pic.twitter.com/HUrf8PUcC2
दोन्ही संघांचं संतुलन कसं : संघांबद्दल बोलायचं झाल्यास, दक्षिण आफ्रिकेच्या संघात कर्णधार टेंबा बावुमानं पुनरागमन केलं आहे, जो दुखापतीतून बरा झाला आहे आणि संघाची जबाबदारी सांभाळेल. मात्र, लुंगी एनगिडी आणि नांद्रे बर्जर दुखापतीमुळं बाहेर आहे. बांगलादेशविरुद्ध 2-0 च्या प्रभावी कसोटी मालिकेतील विजयानंतर, आफ्रिका संघ श्रीलंकाविरुद्ध विजयाचा दावेदार म्हणून सुरुवात करेल. दुसरीकडे, धनंजय डी सिल्वा आणि त्याचे सहकारी 2021 च्या WTC विजेते न्यूझीलंडला मायदेशात 2-0 नं पराभूत केल्यानंतर या मालिकेत प्रवेश करतील आणि आगामी दौऱ्यासाठी एक मजबूत संघ निवडला आहे.
दोन्ही संघांचा हेड-टू-हेड रेकॉर्ड काय : कसोटी क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका 31 वेळा आमनेसामने आले आहेत, ज्यात दक्षिण आफ्रिकेनं 16 सामने जिंकले आहेत, श्रीलंकेनं 9 जिंकले आहेत, आणि 6 सामने अनिर्णित राहिले आहेत. एकंदरीतच दोन्ही संघांमध्ये दक्षिण आफ्रिकेचं पारडं जड वाटत आहे.
Test Cricket Preparations🫡
— Proteas Men (@ProteasMenCSA) November 25, 2024
Our Proteas are grafting hard in their preparations, ahead of the 1st Test Match against Sri Lanka this week.🇿🇦vs🇱🇰
Buy Tickets Now on https://t.co/Fp6Np07IRk 🎟️#WozaNawe #BePartOfIt #SAvSL pic.twitter.com/41qFv4Jbnh
दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिकेचं वेळापत्रक :
- पहिला सामना : 27 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर, डरबन
- दुसरा सामना : 5 डिसेंबर ते 9 डिसेंबर. गकबेराह
दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका यांच्यातील पहिला कसोटी सामना कधी आणि कुठं खेळवला जाईल?
श्रीलंका विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघ यांच्यातील पहिला सामना किंग्समीड, डरबन इथं भारतीय वेळेनुसार दुपारी 01:00 वाजता खेळवला जाईल. ज्याचा टॉस दुपारी 12.30 वाजता होईल.
Putting In The Work!😮💨
— Proteas Men (@ProteasMenCSA) November 26, 2024
Our Proteas are ready for the Sri Lanka challenge. 💪
Catch all the action LIVE as we battle it out in the first of 2 Test Matches this Wednesday!🏏🇿🇦
Get your tickets on: https://t.co/Fp6Np07IRk#WozaNawe #BePartOfIt #SAvSL pic.twitter.com/XhqpLkhUWJ
दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याचं थेट प्रक्षेपण आणि लाईव्ह स्ट्रीमिंग कुठं आणि कसं पहावं?
दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याचं थेट प्रक्षेपण स्पोर्ट्स 18 नेटवर्कवर उपलब्ध असेल. तर सामन्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमा ॲप आणि वेबसाइटवर पाहू शकता.
दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग 11 :
दक्षिण आफ्रिका : टोनी डी झॉर्झी, एडन मार्कराम, ट्रिस्टन स्टब्स, टेम्बा बावुमा (कर्णधार), डेव्हिड बेडिंगहॅम, काइल व्हेरेने (यष्टिरक्षक), वियान मुल्डर, मार्को जेनसेन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज, कागिसो रबाडा.
श्रीलंका : दिमुथ करुणारत्ने, पथुम निसांका, दिनेश चंडिमल, अँजेलो मॅथ्यूज, कामिंदू मेंडिस, धनंजय डी सिल्वा (कर्णधार), कुसल मेंडिस (यष्टीरक्षक), मिलन रथनायके, प्रभात जयसूर्या, असिथा फर्नांडो, विश्व फर्नांडो.
हेही वाचा :