महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये सापडले जुने निवडणुकीचे साहित्य, प्रशासकीय यंत्रणा लागली कामाला - Old Election Materials Found

Old Election Materials Found : ठाण्यात निवडणूक आयोगाचे जुने सामान सापडले आहे. यामुळे प्रशासकीय यंत्रणा चांगलीच खडबडून जागी झाली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचे आदेश दिले.

Old Election Materials Found
Old Election Materials Found

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 26, 2024, 11:10 PM IST

निवडणूक साहित्य सापडल्याबद्दल माहिती देताना बोलताना जिल्हाधिकारी

ठाणेOld Election Materials Found :ठाण्यात निवडणूक आयोगाचे जुने सामान सापडले आहे आणि या सामानामुळे प्रशासकीय यंत्रणा चांगलीच कामाला लागलेली पाहायला मिळाली. दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये काही भाग आजही निवडणूक आयोगाच्या ताब्यात आहे. असे असताना या जागेची दुरुस्ती करावी अशी वारंवार मागणी महापालिका प्रशासनाकडून होत होती. दरम्यान या दुरुस्तीच्या कामानिमित्त निवडणूक आयोगाच्या मंजुरीने हा परिसर पाहिला गेला. या भागात जुने निवडणूक आयोगाचे साहित्य सापडले आहे आणि या सामानामुळे आज जिल्हा प्रशासन सकाळपासूनच कामाला लागलेले पाहायला मिळाले. हे सगळे साहित्य निवडणूक आयोगाच्या मंजुरीने जिल्हा प्रशासनाने ताब्यात घेतले. त्याची पुढील कार्यवाही ही निवडणूक आयोगाच्या मंजुराने जिल्हा प्रशासन करत आहे.


2014 सालच्या निवडणुकीचे साहित्य :सापडलेले साहित्य हे 2014 साली लोकसभा निवडणुकांमध्ये वापरले गेल्याचे समोर आले. याची खातरजमा जिल्हा प्रशासनाकडून केली जात आहे. त्या काळात असलेल्या जुन्या नोंदी या निमित्ताने पुन्हा तपासल्या जाणार असून त्याकाळी असलेल्या नोंदणीमध्ये हे साहित्य आहे की नाही याचा पाठपुरावा आता प्रशासन करणार आहे. सापडलेले साहित्य हे जुने असून या साहित्यावर त्याची इत्यंभूत माहिती देखील आहे. हे सर्व साहित्य जिल्हा प्रशासनाने ताब्यात घेतले असून याची चौकशी झाल्यावरच याचा खुलासा केला जाईल, असे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी सांगितलं आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details