हैदराबाद : सॅमसंग गॅलेक्सी अनपॅक्ड 2025 इव्हेंट या महिन्याच्या अखेरीस सॅन जोस, कॅलिफोर्निया येथे आयोजित केला जाईल. कंपनीनं मंगळवारी या इव्हेटंची घोषणा केली. या कार्यक्रमात नवीन जनरेशन गॅलेक्सी एस सीरीज लाँच केली जाईल. ही मालिका Galaxy S25 मालिका असेल. कंपनीनुसार हा मोबाईल आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) अनुभवासाठी खास असेल. सॅमसंगनं भारतात फोनसाठी प्री-रिझर्वेशनही सुरू केलं आहे.
A true AI companion is coming. Join us at Samsung Galaxy Unpacked on January 22, 2025 at 11:30 PM. Get benefits up to ₹ 5000*.
— Samsung India (@SamsungIndia) January 6, 2025
Pre-reserve now: https://t.co/hJy41emhnH. *T&C apply. #GalaxyAI #GalaxyUnpacked #Samsung pic.twitter.com/xqp0I3RGeb
सॅमसंग गॅलेक्सी अनपॅक 2025 तारीख
सॅमसंगनं त्याच्या आगामी Galaxy Unpacked 2025 इव्हेंटबद्दल तपशील शेअर केला आहे. हा कार्यक्रम 22 जानेवारी रोजी सॅन जोस, कॅलिफोर्निया येथे भारतीय वेळेनुसार सकाळी 10:30 वाजता होणार आहे. हा कार्यक्रम Samsung.com, Samsung Newsroom आणि त्याच्या अधिकृत YouTube चॅनेलवर लाईव्ह-स्ट्रीम केला जाईल. ग्राहक Galaxy प्री-रिझर्व्ह VIP पास मिळविण्यासाठी 1,999 रुपये भरून आगाऊ जागा आरक्षित करू शकतात. आगामी Galaxy फोन खरेदी करताना ई-स्टोअर व्हाउचरद्वारे 5,000 रुपयांचे फायदे मिळवू शकतात.
काय होणार Samsung Galaxy Unpacked 2025 मध्ये
Samsung नं आधीच पुष्टी केली आहे की, ते Galaxy Unpacked 2025 इव्हेंटमध्ये त्यांची नवीन Galaxy S मालिका लॉंच करेल. जुन्या ट्रेंडनुसार तीन मॉडेल्सची घोषणा होण्याची शक्यता आहे. हे मॉडेल Galaxy S25, Galaxy S25,+ आणि Galaxy S25 Ultra असू शकतात. सर्व प्रकारांमध्ये क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन 8 एलिट प्रोसेसर 12GB RAM सह मानक म्हणून असण्याची अपेक्षा आहे.
Galaxy S25 मॉडेलमध्ये 4,000mAh बॅटरी
मानक Galaxy S25 मॉडेलमध्ये 4,000mAh बॅटरी असण्याची अपेक्षा आहे. तर प्लस आणि अल्ट्रा व्हेरियंटमध्ये अनुक्रमे 4,900mAh आणि 5,000mAh बॅटरी असू शकते. सॅमसंगचे अल्ट्रा मॉडेल्स आधीच्या मॉडेल्समध्ये दिसणाऱ्या बॉक्सी डिझाइनपेक्षा वेगळे असू शकतं. त्याचवेळी, मिळालेल्या माहितीनुसार, उर्वरित दोन मॉडेल्समध्ये कोणताही बदल करण्यात होण्याची शक्यता नाहीय.
Galaxy Ring 2 होणार लॉंच
Galaxy S25 मालिकेसोबतच, प्रोजेक्ट Moohan नावाचा (XR) हेडसेट देखील लॉंच होण्याची शक्यता आहे आहे. Moohan ची घोषणा डिसेंबर 2024 मध्ये करण्यात आली होती. तो Google च्या नवीन Android XR प्लॅटफॉर्मवर चालेल, जे ऑगमेंटेड रिॲलिटीला समर्थन देण्यासाठी डिझाइन केलेला आहे. यात (एआर), आभासी वास्तविकता (व्हीआर), आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) अवलंबून वैशिष्ट्ये असतील. Galaxy Ring 2 देखील कार्यक्रमात लॉंच केली जाऊ शकते.
हे वाचलंत का :