महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मोदी यांनी पंतप्रधान पदाची तिसऱ्यांदा घेतली शपथ; संपूर्ण देशात जल्लोषाचं वातावरण - Narendra Modi PM Oath - NARENDRA MODI PM OATH

Narendra Modi PM Oath : नरेंद्र मोदी यांनी आज (9 जून) पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यावर देशभरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. आज या शपथ घेतल्यावर ठाण्यातही जल्लोष पाहायला मिळाला. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी हा आनंदोत्सव साजरा केला. फटाके फोडून नाचत त्यांनी हा क्षण साजरा केला.

Narendra Modi PM Oath
कार्यकर्ते (ETV REPORTER)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 9, 2024, 11:04 PM IST

ठाणेNarendra Modi PM Oath:लोकसभेच्या निवडणुका पार पाडल्या आणि नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीएने बहुमत मिळवले. आज नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. खरं म्हणजे 'अबकी बार ४०० पार'चा नारा देणाऱ्या भाजपाला अपेक्षित यश काही प्राप्त करता आलं नाही. बहुमताचा आकडा गाठताना भाजपाला चांगलीच कसरत करावी लागली. इंडिया अलायन्सने चांगली कामगिरी करत मोठी घोडदौड केली. अशातच भाजपाच्या या विजयाला चांगलेच महत्त्व प्राप्त झाले आहे.

नरेंद्र मोदींविषयी बोलताना कार्यकर्ते (ETV REPORTER)

भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष :मोदींच्या या शपथविधीमुळे भाजपा नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठा आनंद पाहायला मिळत आहे. नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीनंतर आज ठाण्यात भाजपा कार्यकर्ते आणि नेत्यांनी मोठा जल्लोष केला. गुलाल उधळून प्रचंड आतिषबाजी करत सर्वांनी एकमेकांना मिठाया भरवून आनंद व्यक्त केला.

पंतप्रधान पदाची तिसरी टर्म : भारतीय राजकारणात नरेंद्र मोदींनी आपलं राजकीय कौशल्य, लोकप्रियता सिद्धच केली नाही, तर नवा विक्रमही प्रस्थापित केला आहे. रविवारी (9 जून) नरेंद्र मोदींनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. याआधी नरेंद्र मोदी यांनी 2014, 2019 मध्ये पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. त्यांची ही सलग तिसरी टर्म आहे.

मोदींच्या हॅट्रिकनं देशवासीयांमध्ये उत्साह : ऐतिहासिकदृष्ट्या भारतीय राजकारणात मोदींनी आपलं राजकीय कौशल्याचा ठसा उमटवला आहे. नरेंद्र मोदींच्या या हॅट्ट्रिकनं देशवासीयांमध्ये नवा उत्साह दिसून येत आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पीएम मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएनं सलग तिसऱ्यांदा सत्ता मिळवली आहे. मोदींचं हे यश म्हणजे भारतीय राजकारणातील त्यांची मजबूत पकड तसंच लोकांमध्ये असलेली त्यांची अफाट लोकप्रियतेचा पुरावा आहे. आतापर्यंत त्यांच्या नेतृत्वाखाली देशानं अनेक महत्त्वपूर्ण धोरणात्मक सुधारणा, विकासाचे नवे आयाम पाहिले आहेत. आता 9 जून हा दिवस भारतीय राजकारणाच्या इतिहासातील एक महत्त्वाचा अध्याय म्हणून नोंदवला जाणार आहे.

पंतप्रधानांचं बालपण : पंतप्रधान नरेंद्र मोदी (नरेंद्र दामोदर दास मोदी) यांचा जन्म 17 सप्टेंबर 1950 रोजी गुजरातमधील वडनगरमध्ये झाला. त्यांच्या वडिलांचं नाव दामोदरदास मूलचंद मोदी तसंच आईचे नाव हिराबेन होतं. मोदींचं सुरुवातीचं शिक्षण वडनगर येथील भागवताचार्य नारायणाचार्य शाळेत झालं. लहानपणापासूनच त्यांना अभिनय, वादविवाद स्पर्धा, नाटकांमध्ये खूप रस होता. यामुळं त्यांनी शालेय काळात अनेक पुरस्कार पटकावले. शालेय शिक्षणादरम्यान ते एनसीसी कॅडेटही होते. यानंतर त्यांनी अमेरिकेत मॅनेजमेंट, पब्लिक रिलेशनशी संबंधित तीन महिन्यांचा कोर्सही केला, असं मोदींनी आपल्या विविध मुलाखतीत सांगितलंय.

वडिलांसोबत स्टेशनवर विकला चहा : मोदी लहान असताना वडिलांसोबत स्टेशनवर चहा विकायचे. याचा उल्लेख खुद्द पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात अनेकदा केला आहे. वडनगर रेल्वे स्टेशनवर मोदींच्या वडिलांची चहाची टपरी होती. तिथं मोदी वडिलांना मदत करायचे. यामुळेच त्यांना चायवाला पंतप्रधान असंही म्हटलं जातं. 1965 मध्ये भारत-पाक युद्धादरम्यान त्यांनी स्टेशनवरून जाणाऱ्या भारतीय सैनिकांना चहा दिला होता, असा दावा मोदींनी त्यांच्या भाषणात केलाय.

हेही वाचा :

  1. मोदींच्या तिसऱ्या मंत्रिमंडळात राज्यातील 'या' शिलेदारांनी घेतली शपथ; जाणून घ्या, राजकीय प्रोफाईल - Narendra Modi Oath Ceremony
  2. 'गडकरी ते रोडकरी'; भाजपाचा पोस्टरबॉय ते केंद्रीय मंत्री, जाणून घ्या थक्क करणारा राजकीय प्रवास - Nitin Gadkari Political journey
  3. नरेंद्र मोदींनी घेतली तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ, 71 नेत्यांचा मंत्रिमंडळात समावेश - Narendra Modi Takes Oath as PM

ABOUT THE AUTHOR

...view details