वर्धा/नागपूरMahavikas Aghadi:लोकसभा निवडणुकीनंतर कधी-काळी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून अशी ओळख असणाऱ्या वर्धा जिल्ह्याची राजकीय परिस्थिती बदलेली दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षानंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं देखील वर्धा जिल्ह्यात कामाला सुरवात केली आहे. त्यामुळं काँग्रेसच्या गोटात मात्र, काहीशी अस्वस्थता पसरू लागलेली आहे.
काँग्रेसची मोठी अडचण होणार :लोकसभा निवडणुकीच्या वेळी महाविकास आघाडीत वाटाघाटी झाली. त्यानंतर काँग्रेस पक्षाचा हक्काच्या समजला जाणारा वर्धा मतदारसंघ शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला देण्यात आला. त्यामुळं आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीत अनके दावेदार तयार झाले आहेत. यात शरद पवार, उद्धव ठाकरे यांचे पक्ष सर्वात पुढं आहेत. उद्धव ठाकरे यांनी वर्धा, हिंगणघाट या दोन मतदारसंघावर दावा केलाय, तर राष्ट्रवादीसुद्धा आर्वी मतदारसंघासाठी इच्छुक असल्याचं बोललं जात आहे. महाविकास आघाडीतील तीन पक्षाचे स्थानिक नेते परस्पर मतदारसंघ वाटून घेत, असल्यानं काँग्रेसची मोठी अडचण होणार हे जवळजवळ निश्चित मानलं जात आहे.
शरद पवारांची ताकत वाढली :लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये झालेल्या वाटाघाटीत काँग्रेसवासी अमर काळे हे ईच्छा नसतान शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढले. तसंच त्यांनी लोकसभा निवडणुकीत विजय मिळवलाय. त्यामुळं स्वाभाविक राष्ट्रवादी काँग्रेसला वर्धेत पक्षासाठी उज्वल भविष्य दिसत असल्यानं शरद पवार आपला जोर लावणार आहेत.