ETV Bharat / state

मुंबई विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई, तब्बल 'इतक्या' कोटींचा गांजा जप्त - GANJA SEIZED IN MUMBAI

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील कस्टम अधिकाऱ्यांनी एका प्रवाशाकडून तब्बल 11 कोटीहून अधिक किंमतीचा गांजा जप्त केलाय.

Customs seized marijuana worth over Rs 11 crore at Mumbai airport, one person arrested
मुंबई विमानतळावरुन 11.32 कोटी रुपये किंमतीचा गांजा जप्त (ANI)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : 3 hours ago

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Chhatrapati Shivaji Maharaj International Airport) परदेशातून आलेल्या एका प्रवाशाकडून एक दोन नाही तर तब्बल 11 कोटीहून अधिक किंमतीचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. कस्टम विभागाकडून ही कारवाई करण्यात आलीय. बँकॉकहून येणाऱ्या एका प्रवाशाची चौकशी केली असता, त्याच्याकडं अंदाजे 11.32 कोटी रुपयांचे अमली पदार्थ सापडल्याची माहिती, एका अधिकाऱ्यानं दिलीय.

एकाला अटक : मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर परदेशातून करोडो रुपयांचे अमली पदार्थ येणार असल्याची माहिती गुप्तचर विभागाकडून कस्टम विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे प्रवाशाचे प्रोफाइल तयार करून तपास सुरू करण्यात आला. तपासादरम्यान, अधिकाऱ्यांनी सदरील प्रवाशाच्या ट्रॉली बॅगमध्ये व्हॅक्यूम-सीलबंद प्लास्टिकच्या पाऊचमध्ये लपवून ठेवलेले अमली पदार्थ जप्त केला. त्यानंतर संबंधित प्रवाशाला अटक करण्यात आली.

'हायड्रोपोनिक मारिजुआना' : अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'हायड्रोपोनिक मारिजुआना' श्रेणीत येणारे हे अमली पदार्थ उच्च दर्जाचे गांजाचे स्वरूप आहे. हा गांजा बाजारात एक टॉप कॉलिटीचा माल म्हणून ओळखला जातो. याचे ग्राहक देखील तशा प्रकारचे असतात. याची किंमत देखील अमली पदार्थांच्या बाजारात जास्त असल्याची माहिती कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

सुरक्षेत वाढ : 14 ऑक्टोबर रोजी देखील मुंबई विमानतळावर अशीच एक घटना घडली होती. यावेळी कस्टम विभागानं पाच किलो गांजा जप्त केला होता. खाद्यपदार्थाच्या पाकीटमध्ये हा गांजा लपवला होता. परंतु, तपासादरम्यान हे कस्टम विभागाच्या निदर्शनास आल्यामुळं त्या प्रवाशावर कारवाई करण्यात आली होती. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर तस्करीच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होत आहे. त्यामुळं विमानतळावर मोठ्या प्रमाणात सुरक्षा यंत्रणा आणि कस्टम विभागाचे अधिकारी तैनात करण्यात आले असल्याची माहिती कस्टम विभागानं दिली आहे.

हेही वाचा -

  1. वाघाची कातडी विकायला आले अन् कस्टमच्या जाळ्यात अडकले, सहा जणांना रंगेहात अटक - Tiger Skin Selling Case Jalgaon
  2. न्हावा शेवा बंदरात सुपारीची तस्करी; दहा कंटेनरमधून 112.14 मेट्रीक टन सुपारी सीमा शुल्क अधिकाऱ्यांकडून जप्त - Areca Nut Smuggling
  3. सोन्यावरील कस्टम ड्युटी 15 टक्क्यांवरून 9 टक्क्यांवर; सुवर्ण खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी - Gold Purchase In Mumbai

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.