महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईत दहशतवादी हल्ल्याची भीती; पोलीस अलर्ट मोडवर, गर्दीच्या ठिकाणी वाढवली गस्त - Mumbai On High Alert

Mumbai On High Alert: दहशतवादी मुंबईला लक्ष्य करण्याचा धोका असून या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस अलर्ट मोडवर असल्याचं पाहायला मिळतंय. मुंबईत पोलिसांकडून ठिकठिकाणी झाडाझडती घेण्यात येत आहे.

Mumbai On High Alert After Agencies Warn Of Possible Terror Attack
मुंबईत हाय अलर्ट (ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 28, 2024, 12:48 PM IST

Updated : Sep 28, 2024, 1:35 PM IST

मुंबई Mumbai On High Alert :दहशतवाद्यांकडून मुंबईला धोका असल्याची माहिती सेंट्रल एजन्सीनं मुंबई पोलिसांना दिली आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस सतर्क झाल्याचं पाहायला मिळतंय. दहशतवाद्यांकडून मुंबईला धोका असल्याच्या माहितीनंतर मुंबई पोलीस अलर्ट मोडवर असून गर्दीची ठिकाणं आणि धार्मिक स्थळांवर मुंबई पोलिसांकडून नजर ठेवली जात आहे. शहरात तगडी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

मुंबईला दहशतवादी हल्ल्याचा धोका :मुंबईला दहशतवादी हल्ल्याचा धोका असल्याची माहिती केंद्रीय गुप्तचर यंत्रणांना मिळाली. त्यामुळे केंद्रीय गुप्तचर यंत्रणेनं मुंबई पोलिसांना सतर्क राहण्याच्या सूचना जारी केल्या आहेत. मुंबई पोलिसांनी शहरात तगडी सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. शहरातील गर्दीची धार्मीक स्थळं आणि गर्दीच्या ठिकाणांवर पोलीस जवानांना तैनात करण्यात आलं आहे. शहरातील गर्दीच्या ठिकाणांची झाडाझडती घेतली जात आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस अधिकाऱ्यांकडून मॉकड्रील घेण्यात येत आहे.

पोलीस उपायुक्तांना अलर्ट राहण्याच्या सूचना :मुंबई शहरातील विविध पोलीस ठाण्यातील पोलीस उपायुक्तांना अलर्ट मोडवर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळं पोलीस उपायुक्त दर्जाचे अधिकारी गस्तीवर आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून काही संशयास्पद हालचालींची माहिती मिळाल्यास ती तत्काळ पोलीस मुख्यालयाला कळवण्यात यावी, असे आदेश देण्यात आले आहेत. तसंच शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.

क्रॉफर्ड मार्केट परिसरात पोलिसांचे मॉक ड्रिल :केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी मुंबईला संभाव्य दहशतवादी हल्ल्याचा धोका असल्यानं अलर्ट करण्यात आलं आहे. शहरातील गजबजलेलं ठिकाण असलेल्या क्रॉफर्ड मार्केट परिसरात पोलिसांचं मॉक ड्रिल करण्यात आलं आहे. यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, "दहशतवादी धोक्याचा इशारा मिळाल्यानं नागरिकांनी सतर्क राहावं. आगामी विधानसभा निवडणूक असल्यानं देखील सुरक्षेची विशेष काळजी घेण्यात येत आहे."

हेही वाचा :

  1. मुंबई 26/11 बॉम्बस्फोट प्रकरण : दहशतवादी तहव्वूर राणाचं प्रत्यार्पण करणं योग्य, भारताला पूर्ण अधिकार, यूएस अ‍ॅटर्नीचा जोरदार युक्तीवाद - Mumbai Terror Attack
  2. अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलचा मेहुणा आरिफ अबुबकर शेखचा जे जे रुग्णालयात मृत्यू - Chhota Shakeel Kin Died
  3. मुंबई 26/11 बॉम्बस्फोट प्रकरण : दहशतवादी तहव्वूर राणाचं प्रत्यार्पण करणं योग्य, भारताला पूर्ण अधिकार, यूएस अ‍ॅटर्नीचा जोरदार युक्तीवाद - Mumbai Terror Attack
Last Updated : Sep 28, 2024, 1:35 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details