मुंबई-राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या माहीम विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाच्या महेश सावंत यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारावर 1000 हून अधिक मतांनी विजय मिळवलाय. प्रतिस्पर्धी असलेले सदा सरवणकर दुसऱ्या क्रमांकावर फेकले गेलेत. विशेष म्हणजे राज पुत्र असलेले अमित ठाकरे तिसऱ्या स्थानावर असून, त्यांचाही पराभव झालाय. महाराष्ट्र नवनिर्माण सेने(मनसे)चे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे मुंबईतील माहीम मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवत होते. त्यांची लढत शिवसेने(उद्धव बाळासाहेब ठाकरे)चे उमेदवार महेश सावंत आणि शिवसेनेचे सदा सरवणकर यांच्याबरोबर होती.
सदा सरवणकर यांनी मागे हटण्यास नकार दिला होता: अमित ठाकरे हे महेश सावंत यांच्यापेक्षा 15 हजारांहून अधिक मतांनी मागे पडलेत. विशेष म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे महेश सावंत हे दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या सदा सरवणकरांपेक्षा अवघ्या 900 हून अधिक मतांनी आघाडीवर आहेत. खरं तर अमित ठाकरे यांचा पक्ष भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुतीशी संबंधित आहे. असे असूनही सदा सरवणकर यांनी मागे हटण्यास नकार दिला होता. सदा सरवणकर यांनी 2014 आणि 2019 मध्ये माहीम मतदारसंघातून निवडणूक जिंकली होती.
अमित ठाकरे नेहमीच प्रसिद्धीपासून दूर राहिले: अमित ठाकरेंचे चुलत भाऊ आणि उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांनी वरळीतून विजय मिळवलाय. अमित ठाकरे मोठ्या प्रमाणात प्रसिद्धीपासून दूर राहिल्याचं आता बोललं जातंय. अमित ठाकरे वडील राज ठाकरे यांनी स्थापन केलेल्या मनसेत सक्रिय होते. निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार अमित ठाकरे यांनी मुंबई विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्याची माहिती दिली होती. त्यांनी व्यवस्थापन विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त केलीय. अमित ठाकरे यांचे वडील राज ठाकरे यांनी कधीही निवडणूक लढवली नाही. त्यामुळे अमित यांच्या राजकारणातील प्रवेशाकडे घराण्याचा राजकीय वारसा सांभाळण्याचे महत्त्वाचे पाऊल म्हणून पाहिले जात होते. दुसरीकडे त्यांचा चुलत भाऊ आदित्य ठाकरे जे उद्धव ठाकरेंचे पुत्र आहेत, ते आधीच शिवसेना (UBT) पक्षाचे सक्रिय सदस्य राहिलेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी वरळी विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला होता. आदित्य ठाकरे हे वडिलांच्या सरकारमध्ये मंत्रीही होते. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी वरळीतून एकही उमेदवार उभा केला नव्हता, कारण तत्कालीन शिवसेना या मतदारसंघातून आदित्य ठाकरे यांना उमेदवारी दिली होती. आता 2024 च्या निवडणुकीत वरळीतून आदित्य ठाकरेंनी पुन्हा एकदा विजय मिळवलाय.
हेही वाचा...
- मुख्यमंत्रिपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान; म्हणाले...
- महायुतीच्या महाविजयानंतर राज्यात भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष