मुंबई : कल्याण रेल्वे स्थानकावर लोकल ट्रेनचा डबा शुक्रवारी रात्री रुळावरुन घसरल्यानं मोठी खळबळ उडाली. लोकल ट्रेनचा डबा रुळावरुन घसरल्यानं चाकरमान्यांची चांगलीच धावपळ झाली. या अपघातामुळे लोकल ट्रेनचा चांगलाच खोळंबा झाला. अखेर रात्री उशीरा रुळावरुन घसरलेला डबा बाजुला करुन वाहतूक सुरळीत करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली.
कल्याण स्थानकावर लोकलचा डबा रुळावरून घसरला, चाकरमान्यांची तारांबळ
कल्याण रेल्वे स्थानकावर लोकल रेल्वेचा एक डबा घसरल्यानं चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडाली. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसल्याचं रेल्वे प्रशासनानं स्पष्ट केलं.
Published : Oct 19, 2024, 8:23 AM IST
कल्याण रेल्वे स्थानकावर लोकल ट्रेनचा डबा घसरला :कल्याण रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर एका लोकल ट्रेनचा डबा शुक्रवारी रात्री रुळावरुन घसरला. त्यामुळे चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडाली. या घटनेमुळे रेल्वे वाहतूक खोळंबली. याबाबत बोलताना मध्य रेल्वेच्या प्रवक्त्यानं सांगितलं की, "कल्याण रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर एक डबा रुळावरून घसरला आहे. ही लोकल सीएसएमटीकडं जाताना डबा रुळावरून घसरला. त्यात कोणालाही दुखापत झाली नाही."
हेही वाचा :
- मुंबईची अद्भूत लोकल रेल्वे; तुम्हाला माहिती आहेत का 'या' गोष्टी
- ऐन सणासुदीत मुंबईकरांचं टेन्शन वाढलं; तिन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक, घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक नक्की पाहा - Mumbai Local Mega Block
- मध्य रेल्वेच्या वेळापत्रकात 5 ऑक्टोबरपासून होणार बदल, 'या' ठिकाणीही थांबणार जलद लोकल - Mumbai Local Train Update