कोल्हापूर Valentines Day 2024: रोमचे पोप गेलेसियस यांनी 5 व्या शतकात 14 फेब्रुवारी हा दिवस 'सेंट व्हॅलेंटाईन डे' म्हणून घोषित केला होता. तेव्हापासून दरवर्षी 14 फेब्रुवारी हा दिवस जगभरात मोठ्या उत्साहात 'व्हॅलेंटाईन डे' म्हणून साजरा केला जातो. प्रेम ही जगातली सगळ्यात सुंदर गोष्ट आहे. प्रत्येकानं आयुष्यात एकदा तरी प्रेम करावं. तुम्ही सुद्धा एखाद्यावर प्रेम करत असाल, तर आणि ते व्यक्त करायचं असेल तर 'व्हॅलेंटाईन डे' हा प्रेमी युगलांसाठी हक्काचा दिवस मानला जातो. या दिवशी हटके सेलिब्रेशन करुन प्रेमाचा दिवस जगभरात साजरा केला जातो. यासाठी वेगवेगळे फंडे तरुण-तरुणींकडून लढवले जातात. या दिवशी केक कापून 'व्हॅलेंटाईन डे' साजरा करण्याचा ट्रेंड सध्या वाढत आहे. कोल्हापुरातील राजारामपुरीत असणाऱ्या युरोपियन केक यामुळंच मागणी वाढलीय.
युरोपात घेतलं केकचं प्रशिक्षण :कोल्हापुरातील राजारामपुरी 'ओया केक' नावाच्या दुकानात गेली पाच वर्ष प्रथमच युरोपियन केक नावाची संकल्पना व्यावसायिक शोन बडवे यांनी आणली. यासाठी त्यांनी परदेशात जाऊन युरोपियन केक रेसिपीचं स्वतः प्रशिक्षण घेतलं. यानंतर कोल्हापूर आणि पुणे या ठिकाणी युरोपियन केकचा व्यवसाय त्यांनी सुरू केला. काही कारणांनी पुण्यातील दुकान बंद केलं. परंतु आज कोल्हापुरातील राजारामपुरीतील बडवे यांचा वडिलोपार्जित व्यवसाय त्यांनी नेटानं सुरू ठेवलाय.