मुंबई Hamare Baarah Movie Controversy : सुरुवातीपासून वादग्रस्त ठरलेल्या 'हमारे बारह' या चित्रपटामध्ये मुस्लिम समाजाचं चुकीचं चित्रीकरण करण्यात आलं असून चित्रपटाच्या ट्रेलरमधील संवादामुळं मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या जात आहेत. तसंच हा चित्रपट प्रदर्शित करण्यास प्रतिबंध करावा, अशी याचिका पुण्यातील अझर तांबोळी यांनी दाखल केली होती. बुधवारी या प्रकरणी न्यायमूर्ती एन.आर. बोरकर आणि न्यायमूर्ती कमल खता यांच्या सुटीकालीन खंडपीठासमोर सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान या चित्रपटाच्या प्रदर्शनाला मुंबई उच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे.
काय आहे प्रकरण : मुस्लिम समाजाचा धर्मग्रंथ असलेल्या कुराणमधील आयत क्रमांक 223 चा दाखला देऊन चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये जे संवाद दाखवण्यात आलेत ते पूर्णतः चुकीचे आहेत. सदर आयतचा प्रत्यक्षात असलेला अर्थ पूर्णतः चुकीचा दाखवून मुस्लिम समाजाची आणि मुस्लिम महिलांची बदनामी करण्याच्या दृष्टीनं हे संवाद तयार करण्यात आले आहेत, असं मत याचिकाकर्त्यानं नमूद केलय. या प्रकरणी पुण्यातील कोंढवा पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र, पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नसल्यानं न्यायालयात दाद मागण्यात आली.
या चित्रपटाच्या माध्यमातून केवळ इस्लामची नव्हे तर महिलांची देखील बदनामी करण्यात आलीय. तसंच या चित्रपटामुळं मुस्लिम समाजाविरोधात नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण होण्याला हातभार लागू शकतो, अशी भीती देखील याचिकेत व्यक्त करण्यात आली आहे. या चित्रपटातील वादग्रस्त संवाद आणि चित्रीकरणाला सेन्सॉर बोर्डानं दिलेलं (CBFC) प्रमाणपत्र रद्द करावं, अशी मागणी तांबोळी यांनी केली आहे.
'हमारे बारह'च्या रिलीजवर मुंबई उच्च न्यायालयाची स्थगिती; 'या' तारखेला होणार पुढील सुनावणी - Hamare Baarah movie movie controversy - HAMARE BAARAH MOVIE MOVIE CONTROVERSY
Hamare Baarah Movie Controversy : बॉलिवूड अभिनेता अन्नू कपूर यांचा आगामी चित्रपट 'हमारे बारह'च्या प्रदर्शनाला मुंबई उच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे. हा चित्रपट 7 जून रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार होता.
Published : Jun 6, 2024, 2:14 PM IST
या प्रकरणी राज्यातर्फे सहाय्यक सरकारी वकील कविता सोळुंके यांनी बाजू मांडली. ही याचिका जनहित याचिका नसल्यानं त्याची दखल घेऊ नये, अशी मागणी त्यांनी केली. तर, अद्वैत सेठना यांनी सेन्सॉर बोर्डाची बाजू मांडली. ट्रेलरसाठी आम्ही प्रमाणपत्र दिलं नव्हतं, अशी माहिती त्यांनी दिली. या प्रकरणी चित्रपटाचे निर्माते-दिग्दर्शक आणि सेन्सॉर बोर्डानं पुढील सुनावणीदरम्यान आपली भूमिका स्पष्ट करावी,असे निर्देश खंडपीठानं दिले आहेत. पुढील सुनावणी 10 जूनला होणार आहे.
हेही वाचा -
- 'हमारे बारह'च्या दिग्दर्शकासह टीमला जीवे मारण्याच्या धमक्या, अन्नू कपूरनं घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट - Annu Kapoor meets CM Shinde
- 'मामला लीगल है' फेम अभिनेता रवी किशनची डीएनए चाचणी करा, कथित मुलीची मुंबई उच्च न्यायालयात याचिका - Mumbai high court News
- लखन भैय्या चकमक प्रकरणी माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्माला जन्मठेप; काय आहे नेमकं प्रकरण?