महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नवनीत राणांविरोधात शेतकरी आक्रमक; फलक पाहायला चला म्हणत घोषणाबाजी, खासदारांनी घेतला 'काढाता पाय' - Farmer Aggressive On Navneet Rana - FARMER AGGRESSIVE ON NAVNEET RANA

Farmer Aggressive On Navneet Rana : चौसाळा इथल्या हनुमान मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या खासदार नवनीत राणा यांच्याविरोधात शेतकरी आक्रमक झाले. गावात लावलेलं फलक पाहण्यासाठी चला, असा आग्रह धरत शेतकऱ्यांनी मोठी घोषणाबाजी केली. मात्र रात्रीची वेळ असल्यानं तुमच्या काय मागण्या आहेत, त्या सांगा, असं नवनीत राणा यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी घोषणाबाजी करत गदारोळ केला.

Farmer Aggressive On Navneet Rana
खासदार नवनीत राणा

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 24, 2024, 8:56 AM IST

Updated : Apr 24, 2024, 9:13 AM IST

नवनीत राणांविरोधात शेतकरी आक्रमक; फलक पाहायला चला म्हणत घोषणाबाजी

अमरावती Farmer Aggressive On Navneet Rana :भाजपाच्या उमेदवार नवनीत राणा हनुमान जयंतीच्या पर्वावर जिल्ह्यातील अंजनगाव तालुक्यात चौसाळा या गावात मंगळवारी रात्री हनुमान मंदिरात हनुमानाचे दर्शन घेण्यासाठी आल्या होत्या. यावेळी मंदिरातून दर्शन घेऊन नवनीत राणा बाहेर पडल्या असता, शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांमुळे त्या गोंधळून गेल्या. शेतकऱ्यांनी रात्री गावाबाहेरील फलक पहायला चला, म्हणत घोषणाबाजी केली. यावेळी चांगलाच गोंधळ होत असल्यामुळे नवनीत राणा यांना चक्क गावातून काढता पाय घ्यावा लागला.

शेतकऱ्यांचा प्रचंड रोष :नवनीत राणा या हनुमान मंदिरातून बाहेर पडताच गावातील शेतकऱ्यांनी त्यांना गावात एका बाजूला लावण्यात आलेलं फलक वाचण्यासाठी आमच्या सोबत चला अशी मागणी केली. यावर "तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे, मला स्पष्ट शब्दात सांगा. तुमच्या काही अडचणी असतील तर बोला," असे नवनीत राणा म्हणत असताना शेतकऱ्यांनी त्यांच्यासोबत गावात लावलेलं पोस्टर पाहायला चलाच असा हट्ट धरला. नवनीत राणा यांनी कोणतंही पोस्टर पाहण्यासाठी जाण्यास नकार देताच शेतकऱ्यांनी गोंधळ घालून "आम्ही तुम्हाला मागच्या वेळी मतदान करून निवडून आणलं. तुम्ही आमच्या कुठल्याही समस्या सोडवल्या नाहीत. तुम्हाला मत मागण्याचा देखील अधिकार नाही," अशा शब्दात सुनावून नवनीत राणा यांच्याशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. या सर्व प्रकारामुळे चांगलाच गदारोळ झाला.

जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा :नवनीत राणा यांनी "मला अनेक गावांमध्ये जायचं आहे. आता पोस्टर वगैरे पाहायला वेळ नाही," असे म्हणत थेट आपल्या वाहनाच्या दिशेनं त्या निघाल्या असताना जमलेल्या जमावानं 'जय भवानी जय शिवाजी' अशा घोषणा देत नवनीत राणा यांच्या विरोधात देखील घोषणा दिल्या.

नवनीत राणा देखील संतापल्या :चौसाळा ग्रामस्थांचा रोष पाहून नवनीत राणा या सुरक्षा रक्षकांच्या घराड्यात थेट आपल्या वाहनात जाऊन बसल्या आणि त्या गावातून निघाल्या. यावेळी मोठा जमाव त्यांच्या वाहनामागं त्यांच्या विरोधात जोरदार घोषणा देत होता. नवनीत राणा यांनी आपल्या वाहन चालकाला थांबवायला लावून त्या वाहनाखाली उतरल्या आणि प्रचंड चिडून गर्दीमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्या ग्रामस्थांना जाब विचारण्याचा प्रयत्न करायला लागल्या. या गोंधळात सुरक्षा रक्षकांनी नवनीत राणा यांना समोर जाण्यापासून रोखलं. यानंतर नवनीत राणा पुन्हा आपल्या वाहनात बसल्या आणि त्यांचं वाहन गावाबाहेर निघालं. यावेळी ग्रामस्थांनी नवनीत राणा यांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली.

हेही वाचा :

  1. अमरावतीत 'जंग ऐ मैदान'; अमित शाहांच्या सभेवरुन बच्चू कडू आक्रमक; भाजपावर हल्लाबोल - Amravati Lok Sabha Election 2024
  2. नवनीत राणांविरोधात उद्धव ठाकरेंनी थोपाटले दंड; म्हणाले, 'बदला घेणारच' - Lok Sabha Election 2024
  3. अमरावतीत संजय राऊतांविरोधात भाजपा महिला आघाडी आक्रमक; नवनीत राणांविरोधात अपशब्द वापरल्याचा रोष - Sanjay Raut Criticized Navneet Rana
Last Updated : Apr 24, 2024, 9:13 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details