मुंबई Fadnavis should be ashamed : छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचा आवडता सिंधुदुर्ग किल्ला बनवला होता. त्याच सिंधुदुर्गच्या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. ही बाब अत्यंत संतापजनक आणि हृदयावर घाव आणणारी आहे. हा पुतळा तयार करताना कंत्राटदार, शिल्पकार आणि बांधकामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. सरकारने पैसा खाल्लेला आहे. पुतळ्यामध्ये 2 ते 3 हजार कोटी खर्च झालाय असं बोललं जातय. पुतळ्यामध्ये काही लोकांनी कमिशन खाल्लं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसारखे राज्य चालवले गेले पाहिजे. असे लोक सांगतात. पण राज्यकर्त्यांनी त्याच महाराजांच्या पुतळ्यामध्ये पैसे खाल्ले आहेत. पुतळा बनवताना करोडोंचा भ्रष्टाचार झालाय. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार या सर्वांनी घोटाळा केलाय. अजित पवार आज तिकडे आंदोलन करताहेत. पण मी म्हणतो तुम्ही राजीनामा द्या, अशी मागणी राऊतांनी केली. काल (बुधवारी) मालवणमध्ये भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून पोलिसांना धक्काबुक्की झाली, याबद्दल देवेंद्र फडणवीसांना लाज वाटली पाहिजे, अशी खोचक टीका संजय राऊतांनी केली.
देशभक्तीच्या नावावर भ्रष्टाचार, घोटाळा - जिथे जिथे राष्ट्रवाद आणि देशभक्तीचा प्रश्न येतो. तिथे त्यांचा भ्रष्टाचार आहेच. आयएनएस विक्रांतमध्ये पण घोटाळा केलाय. मुलुंडच्या XX पोपटाने 58 कोटी खाल्ले आहेत. याला सर्वस्वी गृहखाते जबाबदार आहे. देवेंद्र फडणवीस यांचे गृहखाते हे अशा प्रकारे काम करत आहे. काल काही लोक पोलिसांना शिव्या देत होते. त्यांच्या तोंडावर थुंकत होते. हे बघून गृहमंत्र्यांच्या शरम वाटली पाहिजे. हे घडत असताना गृहमंत्री काय करत होते? फक्त विरोधकांना त्रास द्यायचा आणि त्यांच्या पाठीमागे चौकश्या लावायच्या. तुमच्याच भाजपाच्या कार्यकर्त्यांनी तुमच्या पोलिसांवर दिवसाढवळ्या थुंकले. शिव्या दिल्या. पण तुम्ही काय केलं? तुम्ही तुमच्या खाकी वर्दीला संरक्षण देऊ शकला नाही. सुरक्षा देणार नसाल तर राजीनामा द्या, अशी मागणी संजय राऊतांनी केली.
बघूया.., करूया..., अशी आश्वासनं तुम्ही देता. परंतु काही करत नाही. तुम्हाला काळजी आहे पश्चिम बंगालची, पण महाराष्ट्रात काय सुरू आहे याच्याकडे लक्ष द्या, असा टोला संजय राऊतांनी फडणवीसांना लगावला. राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रवादाच्या नावावर भाजपाच्या लोकांनी जेवढा भ्रष्टाचार आणि व्याभिचार केला आहे. तेवढा कोणी केला नसेल. महाराजांच्या पुतळ्यामध्ये हजारो कोटी रुपये या लोकांनी खाल्लेत आणि तेच खाल्लेले पैसे निवडणुकीमध्ये वापरले आहेत, असा गंभीर आरोप संजय राऊतांनी महायुतीच्या नेत्यांवर केला. खासकरून सिंधुदुर्गमध्ये या पैशाचा वापर झाला आहे. देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झाल्यावर पहिल्यांदा आयएनएस विक्रांतमध्ये घोटाळा झाला नाही, अशी त्यांनी सही केली. हे सगळे चोर आहेत. यांच्यावरती कसा विश्वास ठेवायचा? त्यामुळे शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये भारतीय जनता पक्षाने जे काम केलं आहे. ते अधम आणि नीच आहे. असा घणाघाती हल्लाबोल संजय राऊतांनी भाजपावर केला.
गृहखात्यावर थुंकण्याचा प्रयत्न -मालवण काल जो राडा झाला, जी गुंडागर्दी झाली, महाराष्ट्राच्या गृहखात्यावर थुंकण्याचा प्रयत्न झाला. भाजपाचे कार्यकर्ते गृहखात्यावर थुंकले आहेत. भाजपाच्या गुंडांनी यात आमदार कोण, खासदार कोण असतील मला माहीत नाही. पण देवेंद्र फडणवीस यांना हे पाहताना गृहमंत्री म्हणून लाज वाटली पाहिजे, अशी सडकून टीका संजय राऊतांनी फडणवीसांवर केली. पोलिसांची प्रतिष्ठा, सन्मान आणि संरक्षण हे गृहखाते देऊ शकले नाही. काल पोलिसांवर फक्त हल्ले करायचे बाकी होते. यानंतर नारायण राणेंबद्दल ते म्हणतात की, त्यांची बोलण्याची स्टाईल आहे. असं फडणवीस समर्थन करतात. याबद्दल त्यांना शरम वाटली पाहिजे. मग आम्ही असं बोललो की लगेच आमच्यावर गुन्हे दाखल करता. या निमित्ताने महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा उद्ध्वस्त झालं आहे.
"...फडणवीसांना लाज वाटली पाहिजे" संजय राऊतांची खोचक टीका; म्हणाले, बाळासाहेब महाराष्ट्राचे बाप! - Fadnavis should be ashamed
Fadnavis should be ashamed - मालवणमधील घटनेचा समाचार घेताना आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर चांगलाच निशाणा साधला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्यावरुन होत असलेल्या राजकारणाचा समाचार घेताना बाळासाहेब महाराष्ट्राचे बाप असल्याची डरकाळी राऊत यांनी फोडलीय. वाचा सविस्तर...
Published : Aug 29, 2024, 12:07 PM IST
...महाराजांनी कडेलोट केला असता - कालचा जो प्रकार झाला तो पाहताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस तुमच्या काळजाला धक्का बसला नाही? त्यांचेच भाजपाचे कार्यकर्ते पोलिसांना धमकावत आहेत. काय चाललय काय या राज्यात? राज्यात कायदा आणि सुव्यवस्था आहे का? राष्ट्रपतींना पश्चिम बंगालमधल्या कायदा आणि सुव्यवस्थेची काळजी आहे. पण शिवरायांच्या महाराष्ट्रात काय सुरू आहे, याबद्दल वेदना होत नाहीत का? असा सवाल राऊतांनी उपस्थित केला. एवढा मोठा महाराजांचा पुतळा पडला आणि हे मिंधे सगळा दोष नेव्हीला देताहेत. वर्षानुवर्ष नेव्हीच्या बोटी समुद्रात आहेत. पण त्या कधी बुडल्या नाहीत. त्या कधी कोसळल्या नाहीत. अनेक पुतळे हे समुद्राच्या काठी आहेत, शिवाजी पार्कच्या बाजूला महाराजांचा पुतळा आहे, लोकमान्य टिळकांचा समुद्राकाठी पुतळा आहे, हे पुतळे खंबीरपणे उभे आहेत. कारण याच्यात भ्रष्टाचार झाला नाही. मालवणमध्ये उभारलेला महाराजांच्या पुतळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. तुमचे अपयश झाकण्यासाठी भारतीय नौदलाला भ्रष्टाचारी ठरवता. धिक्कार असो तुमचा, छत्रपती शिवाजी महाराज आज असते तर, अशा लोकांचा कडेलोट केला असता. म्हणून आम्ही एक तारखेला यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन करणार आहोत, असा निशाणा राऊतांनी साधला.
कुठे पाप फेडाल -पंतप्रधान नरेंद्र मोदी जिथे-जिथे हात लावतात, त्या-त्या गोष्टी उद्ध्वस्त होतात. पडतात..., कोसळतात याची अनेक उदाहरणे देता येतील. महाराष्ट्रात सोनं आहे, परंतु या सोन्याचं ते माती करताहेत. समृद्धी महामार्ग बनवला. त्याचे फोटो आम्ही समोर आणलेत ते तुम्ही बघावेत. यांचा सगळा खेळ टेंडरचा आहे. हेलिपॅड बनवतात, त्यामध्येही पैसे खातात. बाळासाहेब ठाकरे हे उद्धव ठाकरे यांचे वडील आहेत. पण तो महाराष्ट्राचा बाप आहे. आणि नारायण राणे बाळासाहेब ठाकरे यांच्या बाबतीत एवढी नमक हरामी करत असतील तर, त्याच्यापेक्षा दुसरे दुर्दैव नाही, असं राऊत म्हणाले. ज्या बाळासाहेब ठाकरे यांनी नारायण राणे यांना मुख्यमंत्री केलं..., सर्व पदं दिली..., प्रतिष्ठा दिली..., त्याच बाळासाहेबांच्या पुतळ्यापर्यंत नारायण राणे येत असतील तर जे आम्ही उद्या जोडे मारो आंदोलन करतोय ते अगदी योग्य आहे, असं राऊत म्हणाले. बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळावरून तुमच्या पोटात वाईट वाटत आहे. मात्र अफजलखानप्रमाणे यांच्या पोटाचे पण ऑपरेशन करावे लागेल. ज्यांनी तुम्हाला पोटाला लावले, ज्यांनी महाराष्ट्र घडवला..., ज्यांनी तुम्हाला मानसन्मान दिला..., त्या बाळासाहेब ठाकरेंबद्दल प्रश्न उभा करता, कुठे फेडाल हे पाप? असं राऊत म्हणाले.