महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

माजी पोलीस महासंचालक संजय पांडेंच्या अडचणीत वाढ; आज ठाणे गुन्हे शाखा करणार कसून चौकशी

माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्याविरोधात खोट्या गुन्ह्यात अडकवून खंडणी उकळल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी आज ठाणे गुन्हे शाखेकडून आज त्यांची चौकशी होणार आहे.

SANJAY PANDEY EXTORTION CASE
माजी पोलीस महासंचालक संजय पांडे (ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : 6 hours ago

ठाणे :माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्याविरोधात व्यावसायिक संजय पुनामिया यांनी तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्यासह त्यांच्या सहा सहकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. खोट्या प्रकरणात गोवण्यासह व्यावसायिकांकडून पैसे उकळण्याचा आरोप संजय पांडे यांच्यावर करण्यात आला. या प्रकरणी आज ठाणे गुन्हे शाखेचे अधिकारी पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव यांच्या नेतृत्वात त्यांची चौकशी करत आहेत.

खोट्या गुन्ह्यात अडकवून पैसे उकळल्याची तक्रार : ठाण्यातील व्यावसायिक संजय पुनामिया यांनी तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. ठाण्यातील पोलीस ठाण्यात संजय पुनामिया यांनी ही तक्रार दाखल करत खोट्या गुन्ह्यात अडकवून पैसे उकळल्याचा आपल्या तक्रारीत आरोप केला. या प्रकरणात माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्यासह त्यांच्या सहा सहकाऱ्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला.

संजय पुनामिया यांनी तक्रारीत काय केला दावा :व्यावसायिक संजय पुनामिया यांनी आपल्या तक्रारीत माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी खोट्या तक्रारीत अडकवून पैसे उकळल्याचा आरोप केला. त्यांनी नमूद केलं, की "मे 2021 ते 30 जून 2024 या कालावधीत गुन्हा दाखल झालेल्या आरोपींनी आपल्याला त्रास दिला. आरोपींनी ठाणे नगर पोलिसांमध्ये 2016 मध्ये दाखल झालेल्या एका गुन्ह्याचा बेकायदेशीर तपास केला. या प्रकरणी मला आणि इतर व्यावसायिकांना खोट्या केसच्या धमक्या दिल्या आणि पैसे उकळले. विशेष सरकारी वकील म्हणून खोटे दस्तऐवज तयार करून न्यायालयाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला," असं तक्रारदार संजय पुनामिया यांनी आपल्या तक्रारीमध्ये म्हटलं आहे. ठाणेनगर पोलीस ठाण्यात 26 ऑगस्ट 2024 रोजी ईमेलद्वारे संजय पुनामिया यांनी ही तक्रार दाखल केली. या प्रकरणी आज गुन्हे शाखा उपायुक्त अमरसिंग जाधव या कसून चौकशी करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

काय म्हणाले माजी पोलीस महासंचालक संजय पांडे :माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्याविरोधात खोट्या गुन्ह्यात अडकवून पैसे उकळल्याचा आरोप संजय पुनामिया या व्यावसायिकांनी केला आहे. यावर आज संजय पांडे यांची ठाण्यातील गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव हे चौकशी करणार आहेत. यावेर प्रतिक्रिया विचारली असता, माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी हसत हसत उत्तर दिलं. ते म्हणाले, की "माझ्यावर पोलिसांनी आरोप लावले आहेत, कशा प्रकारे आरोप लावले, ते आता पुढं बघू"

हेही वाचा :

  1. माजी पोलीस महासंचालक संजय पांडेंच्या अडचणी वाढल्या : पैसे उकळल्याप्रकरणी 7 जणांवर गुन्हा दाखल - FIR Against EX DGP Sanjay Pande
  2. Sanjay Pande Inquiry Report : देवेन भारती यांच्याबाबतचा संजय पांडे यांचा चौकशी अहवाल राज्य सरकारने फेटाळला
  3. माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या विरोधात सीबीआयकडून तीन गुन्हे दाखल, 16 ठिकाणी छापेमारी

ABOUT THE AUTHOR

...view details