महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

"पळून पळून कुठं जाणार होता?", जयदीप आपटेच्या अटकेवर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया - Eknath Shinde - EKNATH SHINDE

Eknath Shinde on Jaydeep Apte Arrest : राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटेला बुधवारी (4 सप्टेंबर) अटक करण्यात आली. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिलीय.

Eknath Shinde first reaction on Jaydeep Apte arrest also criticized Uddhav Thackeray In Mumbai
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (ANI)

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 5, 2024, 7:38 PM IST

मुंबई Eknath Shinde on Jaydeep Apte Arrest : राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटेला अटक करण्यात आलीय. जयदीप आपटे 26 ऑगस्टपासून म्हणजेच पुतळा कोसळल्याच्या दिवसापासून फरार होता. 4 सप्टेंबरला तो कल्याणला त्याच्या आई आणि पत्नीला भेटायला आला होता, त्यावेळी त्याला पोलिसांनी अटक केली. यासंदर्भात आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे : मुंबईत प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, "मी याअगोदरही सांगितलं होतं की, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ज्यानं बनवला तो जयदीप आपटे पळून पळून कुठं जाणार होता? त्याला आमचे पोलीस आणि गृहखाते पकडणार होतेच आणि तसंच झालं. पुतळा कोसळल्याच्या घटनेत जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल. कुणालाही सोडणार नाही. जयदीप आपटेवर जी काही कारवाई करायची आहे, ती पोलीस आणि गृहखाते करतील. त्याच्यावर कडक कारवाई होईल." तसंच छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्यासाठी दैवत आहेत. हा पुतळा पडणे ही दुर्दैवी घटना आहे. परंतु, विरोधकांकडून याचं राजकारण केलं जातय हे दुर्दैव असल्याचंही शिंदे म्हणाले.

आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढं नेतोय : पुढं शिंदे म्हणाले, "जेव्हा हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात होते. तेव्हा दिल्लीतील बडे नेते मुंबईत आणि मातोश्रीवर यायचे. परंतु, आता यांना दिल्लीच्या गल्ली-गल्लीत फिरावं लागतंय. 'मला मुख्यमंत्री करा, मला मुख्यमंत्री करा' म्हणून यांना सांगावं लागतंय हे दुर्भाग्य आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडल्यामुळं यांच्यावर अशी वेळ आली आहे." आम्ही बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांचे विचार पुढं नेत आहोत, असंही ते म्हणाले.

हेही वाचा -

  1. जयदीप आपटेला बेकायदेशीर काम देणारे सूत्रधार आजही सरकारमध्ये-संजय राऊत - Sanjay Raut News
  2. शिवरायांचा पुतळा दुर्घटना प्रकरणी शिल्पकार जयदीप आपटेला अखेर अटक, 10 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी - shivaji maharaj statue collapse
  3. भाजपाच्या लाडक्या उद्योगपतीकडून शिवरायांच्या पुतळ्याची मुंबईत विटंबना-संजय राऊतांचा आरोप - Sanjay Raut today news

ABOUT THE AUTHOR

...view details