मुंबई Dadar East Monorail Station Rename : 'दादर पूर्व मोनोरेल स्थानक' आता 'विठ्ठल मंदिर स्थानक' म्हणून ओळखलं जाणार आहे. खासदार राहुल शेवाळे यांच्या पाठपुराव्यामुळं हे नामकरण झालंय. मात्र, आता यावरुन विरोधकांनी आरोप करण्यास सुरुवात केलीय. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नामकरण करण्यास सत्ताधाऱ्यांनी सुरुवात केली असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. याला खासदार राहुल शेवाळ यांनी प्रत्युत्तर दिलंय.
दादर मोनोरेल स्थानकाचं नामकरणाबाबत निर्णय प्रलंबित होता. प्रलंबित असलेला हा निर्णय आता पूर्ण झालाय. लोकं बोलतील की कामं झाली नाहीत, त्यामुळं हा निर्णय घेतलाय. विरोधकांनी केलेले आरोप बिनबुडाचे आहेत - राहुल शेवाळे, खासदार
दादर मोनोरेल स्थानकाला नवीन नाव : चेंबूर ते संत गाडगे महाराज चौक या मोनोरेल मार्गिकेवरील दादर पूर्व स्थानकाचं नामकरण आता 'विठ्ठल मंदिर मोनोरेल स्थानक' असं करण्यात आलंय. शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते खासदार राहुल शेवाळे यांनी याबाबत केलेल्या पाठपुराव्याला यश आलंय. स्थानिकांची मोठी मागणी प्रत्यक्षात उतरली असल्याची प्रतिक्रिया खासदार राहुल शेवाळे यांनी 'ईटीव्ही भारत'बरोबर बोलताना दिलीय.