महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुख्यमंत्र्यांचा नक्षलवाद्यांना थेट इशारा; म्हणाले, "नक्षलवादी शेवटची..." - DEVENDRA FADNAVIS ON NAXALITES

गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी एका माजी पंचायत समितीच्या सभापतीची हत्या केल्याची घटना घडली. याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.

Devendra Fadnavis
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नक्षलवादी (File Photo)

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 2, 2025, 5:54 PM IST

नांदेड : पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरुन नक्षलवाद्यांनी भामरागड पंचायत समितीच्या माजी सभापतीची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या प्रकरणाची दखल राज्याचे मुख्यमंत्री आणि गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी घेतली. "ज्यांनी हे कृत्य केलंय त्यांच्यावर महिनाभरात कारवाई केली जाईल,".असा इशारा मुख्यमंत्र्यांनी नक्षलवाद्यांना दिलाय.

"नक्षलवादी शेवटची घटका मोजत आहेत. माजी सभापतींची निराशेतूनच हत्या केली. त्यावर निश्चित कारवाई करण्यात येईल. ज्या ठिकाणी नक्षलवाद्यांनी कागद ठेवला, त्या ठिकाणी पोलिसांचा खबऱ्या असल्याबद्दल त्यांच्यावर आरोप झाला. यासंदर्भात पोलीस काम करत आहेत. साधारणपणे हत्या कोणी केली असेल, याचा अंदाज त्यातून येत आहे आणि निश्चितपणे त्यांच्यावर कारवाई केली जाईल. आज गडचिरोलीमध्ये एक प्रकारे नक्षलवादी निराश झाले आहेत. कारण सातत्याने नक्षलवादी आत्मसर्पण करत आहेत. आता शेवटच्या घटका नक्षलवादी मोजत आहेत. निराशेतूनच केलेली ही हत्या दिसत आहे." - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (ETV Bharat Reporter)

शक्तीपीठ महामार्ग : शक्तीपीठ महामार्गासाठी होत असलेल्या विरोधावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, "मी सर्व आमदारांशी चर्चा केली. विरोध बिलकुल नाही. काही मूठभर लोकांचा विरोध आहे. मी सर्व आमदारांना भेटलो आहे आणि सर्व आमदारांनी शक्तीपीठाला समर्थन दर्शवलं आहे."

बुलेट ट्रेनसाठी निधी : "दरवर्षी अर्बन सेवेसाठी निधी महाराष्ट्र सरकारला मोठ्या प्रमाणात मिळतो. बुलेट ट्रेनसाठी कन्स्ट्रक्शनचा हा निधी आहे. त्यामुळं तो चार हजार कोटींचा आहे. मला असं वाटतं की, थोडं डोकं लावलं आणि समजून घेतलं तर या गोष्टी समजू शकतात. पण विरोधकांना या गोष्टी समजून घ्यायच्या नाहीत," अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांचा समाचार घेतला.

हेही वाचा -

  1. निवडणूक विरोधाचा नक्षलवाद्यांचा डाव जवानांनी एन्काउंटर करुन उधळला; आतापर्यंत 14 नक्षल्यांचा खात्मा
  2. आबुझमाड चकमक : आबुझमाडच्या जंगलात आणखी एका नक्षलवाद्याला कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला यश
  3. देवेंद्र फडणवीस नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी गडचिरोलीत; कुख्यात नक्षली कमांडर तारक्काचं साथिदारांसह आत्मसमर्पण

ABOUT THE AUTHOR

...view details