कोल्हापूर : देशविदेशातील मऊमऊ मांजरांच्या अदा, नखरे अन् त्यांच्यात रंगलेल्या स्पर्धा, प्रदर्शन पाहण्यासाठी रविवारी (1 डिसेंबर) हजारांहून अधिक आबालवृद्धांनी कोल्हापुरात गर्दी केली होती. फेलाईन क्लब ऑफ इंडियाच्यावतीनं रविवारी महासैनिक दरबार हाॅल येथे अनोख्या 'कॅट शो'चं आयोजन (Cat Show In Kolhapur) करण्यात आलं होतं. त्यात विविध जातींच्या अशा दोनशेहून अधिक मांजरांच्या अदा पाहण्यासारख्या होत्या.
'या' प्रजातींची मांजरं ठरली आकर्षणाचं केंद्र :या शोमध्ये जगभरात सर्वाधिक पसंत केल्या जाणाऱ्या पर्शियन कॅट, क्लासिक लाँग हेअर, बेंगाल कॅट, मेनकुन, ब्रिटिश शॉर्ट हेअर, एक्झॉटिक शॉर्ट कॅट, सैबेरियन कॅट, सियामिस, ओरीवो, भारतीय जातीचे इंडी माऊ अशा विविध जातीच्या 200 हून अधिक मांजर महाराष्ट्र, आंध्र, गोवा, कोलकाता, कर्नाटक अशा राज्यांतून आली होती. या प्रदर्शनातील मांजर पाहण्यासाठी कोल्हापुरातील मांजर प्रेमींनी गर्दी केली होती. या सर्वांमध्ये बेंगाल टायगर सारखा दिसणारा बेंगाल कॅट सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.
कॅट शोची कोल्हापूरकरांना भुरळ (ETV Bharat Reporter) मांजरांच्या किंमती किती? : अगदी 5000 पासून लाखांपर्यंतचे मांजर या शोमध्ये ठेवण्यात आली होती. या शोमध्ये मांजरांची निगा कशी राखावी तसंच त्यांचं लसीकरण, त्यांचा आहार काय असावा याचीही माहिती देण्यात आली. तसंच मांजराचं वजन किती? आणि ते किती चपळ आहे? अशा विविध कॅटेगिरीत परीक्षण करुन त्यांचे नंबरही काढण्यात आले. दरम्यान, कोल्हापुरात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात पाळीव प्राणी पाळण्याची क्रेझ वाढली आहे. संस्थेच्या वतीनं 2019 या वर्षात पहिल्यांदाच कोल्हापुरात कॅट शो झाला होता. यावेळी मांजर प्रेमी पालकांकडून मिळालेल्या प्रतिसादामुळं देशभरातील मांजर प्रेमीही अचंबित झाले होते. यामुळंच गेल्या पाच वर्षात कोल्हापुरात चौथ्यांदा कॅट शोचं आयोजन करण्यात आलं आणि याला कोल्हापूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
हेही वाचा -
- Video साताऱ्यात आढळली दुर्मिळ वाघाटीची दोन पिल्ले, देखभालीसाठी पाठवली बोरीवली केंद्रात...पाहा व्हिडिओ
- Cat Show in Nagpur : अमेरिकन मेनकूनचा आकाराने तर बेंगॉली कॅटच्या रंगाने वेधले लक्ष
- कोल्हापुरातील 'कॅट शो'मध्ये अवतरल्या 400 हून अधिक प्रकारच्या 'मनी माऊ'