महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिनी भाजपा आमदार श्रीकांत भारतीय यांची 'श्वान शंभू'ची वादग्रस्त पोस्ट, मराठा संघटनांकडून निषेध - Shrikant Bhartiya Controversy - SHRIKANT BHARTIYA CONTROVERSY

Shrikant Bhartiya Controversy : देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू आमदार श्रीकांत भारतीय यांनी त्यांच्याकडे आणलेल्या श्वानाचं नाव शंभू असं ठेवल्याचं ऑनलाइन पोस्ट करून सांगितलं. यावर मराठा संघटनांनी संताप व्यक्त केला आहे. संभाजी ब्रिगेडनं याला श्रीकांत भारतीय यांचा वैचारिक दरिद्रीपणा म्हटलं आहे.

Shrikant Bhartiya Controversal Post
श्रीकांत भारतीय

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 10, 2024, 5:43 PM IST

संतोष शिंदे हे श्रीकांत भारतीय यांच्या कृत्यावर टीका करताना

पुणेShrikant Bhartiya Controversy:भाजपा आमदार श्रीकांत भारतीय यांनी एक फेसबुक पोस्ट केली असून त्यांच्या पोस्टवर मराठा संघटनांकडून कठोर शब्दात टीका करण्यात येत आहे. त्यांच्या या पोस्टवर संभाजी ब्रिगेडने निषेध व्यक्त करत संतापजनक प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले श्रीकांत भारतीय :देवेंद्र फडवणीस यांचे विश्वासू असलेले आमदार श्रीकांत भारतीय यांनी त्यांच्या घरामध्ये एक श्वान आणला आहे. त्या पोस्टमध्ये श्रीकांत भारतीयांनी असे म्हटले की, "निवडणुकांचे व्यवस्थापन दौरे यामध्ये थोडासा दिलासा मिळणारी गोष्ट म्हणजे एक नवीन पाहुणा आमच्या घरी आला आहे. त्या पाहुण्याचं नाव शंभू ठेवण्यात आलेलं आहे." तर पाहुणा म्हणजे श्रीकांत भारतीय यांनी आणलेला एक श्वान आहे.

मराठा संघटनांची काय आहे टीका :गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान देश आणि धर्मासाठी होते; परंतु त्यात छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाच्या दिवशी एखादं श्वानाचं पिल्लू आपल्या घरी आणून त्याचं नाव शंभू ठेवणं, निषेधार्थ असल्याची टीका मराठा संघटना करत आहेत.

ही तर विकृतीच : संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे यांनी म्हटलं आहे की, भाजपा नेत्यांना खासकरून श्रीकांत भारतीय यांना लाज वाटली पाहिजे. त्यांनी त्यांच्या श्वानाचं नाव शंभू ठेवलं आहे. किती हा शंभूराजेंबद्दल अनादर आहे. ही मंडळी जाणीवपूर्वक स्वतःच्या डोक्यातील विकृती वारंवार दाखवण्याचा प्रयत्न करतात. एका पोस्टमध्ये श्वानाचं नाव शंभू ठेवले हे तीनदा लिहावं लागतं. हा यांच्या मनातला खोडसाळपणा आहे तो समोर आलेला आहे. महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमी जनतेचा, शंभूप्रेमी जनतेचा या श्रीकांत भारतीय यांनी भावना दुखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे शिवद्रोही आणि शंभूद्रोही आहेत.

हा तर वैचारिक दरिद्रीपणा :श्रीकांत भारतीयांनी ही पोस्ट तत्काळ काढून टाकावी; अन्यथा संभाजी ब्रिगेड धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. निवडणुका आल्यात. त्याला गालबोट लावण्याचं काम श्रीकांत भारतीयांनी करू नये. श्वानाचं नाव शंभू ठेवण्याची हिंमत कशी होते? जाणीवपूर्वक हे नाव ठेवलं असं ठासून सांगण्याची हिंमत श्रीकांत भारतीय कसे करतात. हा श्रीकांत भारतीयांचा वैचारिक दरिद्रीपणा दिसत आहे. भाजपा नेत्यांनी त्यांना समज द्यावी; अन्यथा संभाजी ब्रिगेड हे सहन करणार नाही, असा इशारा संतोष शिंदे यांनी दिला आहे. दुसरीकडे भारतीय यांच्या पोस्टवर विविध प्रतिक्रिया उमटू लागल्यानंतर त्यांनी ही पोस्ट हटवल्याचं दिसून येत आहे.


हेही वाचा :

  1. भगवंत मान आणि संजय सिंह आज केजरीवालांना भेटू शकणार नाहीत, तिहार प्रशासनानं नाकारली परवानगी - Arvind Kejriwal in Jail
  2. माजी आयएएस अधिकाऱ्याकडून रामलल्लाच्या चरणी 5 कोटी रुपयांचं रामायण अर्पण, तब्बल सात किलो सोन्याची आहेत पाने! - GOLDen RAMAYANA
  3. राजकारणातील चाणक्यानं फेकला शेवटचा पत्ता, धैर्यशील मोहिते पाटील 13 एप्रिलला शरद पवार गटात करणार प्रवेश - loksabha election 2024

ABOUT THE AUTHOR

...view details