नवी मुंबईAction on pubs in Navi Mumbai :नवी मुंबई शहरात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर बार आणि पब संस्कृती वाढीस लागली आहे. मंगळवारी मध्यरात्री झालेल्या या कारवाईमुळे अनधिकृत डान्सबार, लिकर बार, तसंच ढाबे धारकांचं धाबं दणाणलं आहेत. शहरात कोणत्याही प्रकारचे अनधिकृत अतिक्रमण खपवून घेतले जाणार नाही असं अतिक्रमण विभाग प्रमुख डॉ. राहुल गेठे यांनी म्हटलं आहे.
पब, बारवरील अतिक्रमण विरोधी कारवाईविषयी सांगताना राहुल गेठे (ETV Bharat Reporter)
बार, पबच्या बांधकामांचा सुळसुळाट : नवी मुंबईत अनेक भागात अनधिकृत पब आणि बार सुरू आहे. रात्री, अपरात्री या पब आणि बारमध्ये मोठ्या प्रमाणात धिंगाणा सुरू असतो. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडण्याची मोठ्या प्रमाणात शक्यता असते. त्याचप्रमाणे नवी मुंबईत असणाऱ्या बार आणि पब धारकांनी मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामं देखील केली आहेत. नवी मुंबईत बार आणि पबमुळे कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी मोठी खबरदारी घेतली जात आहे. या अनधिकृत बारवर पोलिसांची आणि महापालिकेची करडी नजर आहे.
रात्री ॲक्शन मोडमध्ये येऊन केली कारवाई : पुण्यातील अपघात प्रकरणाचा धसका घेऊन अनेक अनधिकृत पब आणि बारवर कडक कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे मंगळवारी मध्यरात्री नवी मुंबई मनपा, पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाने संयुक्तपणे नवी मुंबईतील वाशी, नेरूळ, सीबीडी येथील १० डान्स बार, ५ पब, लिकर बार, अनधिकृत धाब्यांवर नवी मुंबई महापालिका अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. राहुल गेठे यांच्या नेतृत्वाखाली कारवाई केली आहे. चुकीच्या पद्धतीनं बांधकाम करणे, परवानगीपेक्षा मोठा बोर्ड लावणे, वेळेचं बंधन न पाळता डान्सबार सुरू ठेवणे अशा कारणास्तव ही कारवाई करण्यात आली. यावेळी पब, डान्स बारमधील नियमबाह्य बांधकाम तोडण्यात आलं.
हेही वाचा :
- 31 मे पर्यंत पॅनकार्ड आधार लिंक करा.. अन्यथा होईल कारवाई - AADHAR PAN CARD
- पुणे पोलीस आयुक्तालयाच्या आवारात दारूच्या बाटल्या; विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा पोलिसांवर हल्लाबोल - Vijay Wadettiwar On Pune Police
- ''मोदींचा पराभव व्हावा ही प्रत्येक पाकिस्तानीची इच्छा...''; पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांनी राहुल गांधींबाबत काय म्हटलं? - Lok Sabha Elections 2024