महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शंभर वर्षे जुनी इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली दबून एका महिलेचा मृत्यू, तर तीन जण गंभीर - Amravati Building Collapsed - AMRAVATI BUILDING COLLAPSED

Two Storied Building Collapsed : राज्यासह देशभरात आज (7 सप्टेंबर) गणेशोत्सवाचं आनंददायी वातावरण असताना अमरावतीच्या परतवाडा येथून एक अपघाताची बातमी समोर आलीय. अमरावतीच्या परतवाडा येथे दोन मजली जीर्ण इमारत कोसळली. त्यामुळं परतवाडा शहरात एकच खळबळ उडाली आहे.

100 years old two storied building collapsed at amravati paratwada, One died and three injured
अमरावतीत शंभर वर्षे जुनी इमारत कोसळली (ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 7, 2024, 8:22 PM IST

अमरावती Two Storied Building Collapsed : परतवाडा शहरात पेन्शन पुरा भागात शनिवारी (7 सप्टेंबर) सकाळी शिकस्त झालेली शंभर वर्ष जुनी दुमजली इमारत कोसळली. या घटनेत या इमारतीत वास्तव्यास असणारी महिला ठार झाली असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळं अचलपूर-परतवाडा शहरात एकच खळबळ उडाल्याचं बघायला मिळतंय.

पेन्शनपुरा परिसरात खळबळ : आज घडलेल्या या दुर्देवी घटनेत इमारतीत राहणाऱ्या आशा अण्णाजी उमेकर या 72 वर्षाच्या महिलेचा मलब्याखाली दबून मृत्यू झाला. तर त्यांच्या घरात वरच्या मजल्यावर भाड्यानं राहणारे विशाल घोरपडे, ऐतराज घोरपडे आणि घोरपडे यांचा भाचा बोरीस थॉमस हे गंभीर जखमी झालेत. या तिघांवर अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इमारत कोसळताच परिसरातील नागरिकांनी इमारतीच्या दिशेनं धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार डॉ. संजय गरकर, मुख्याधिकारी धीरजकुमार गोहाड, नायब तहसीलदार जगदीश मंडपे, मंडल अधिकारी गजानन दाते, तलाठी जगदीश पानसे, अग्निशमन आणि पोलीस दल यासह जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झालेत.

चार तासानं आढळला मृतदेह : पेन्शनपुरा परिसरातील शंभर वर्ष जुनी जीर्ण झालेली इमारत कोसळल्यावर त्यात राहणाऱ्या आशा अण्णाजी उमेकर या वृद्ध महिलेचा मृतदेह जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकासह पोलीस दलाला मातीच्या ढिकार्‍यातून शोधण्यासाठी चार तास लागले. तर मुसळधार पावसामुळं आणि जीर्ण झाल्यानं इमारत कोसळली असल्याची प्रथमिक माहिती पुढं आली आहे.

हेही वाचा -

  1. बसची टेम्पोला जोरदार धडक; अपघातात 15 जणांचा मृत्यू, तेराव्याचा कार्यक्रम आटोपून परतत होते घरी - Bus Tempo Road Accident
  2. मुंबई पुन्हा हादरली ;भरधाव कारनं घेतला महिलेचा बळी, जमावानं कार चालकाला बेदम चोपलं - Mumbai Hit And Run
  3. दहीहंडीचं बक्षीस जिंकल्यानं सेलिब्रेशन केलं, पिकनिकवरुन परतणाऱ्या दोघांना कंटेनरनं चिरडलं - Two Killed Container Accident

ABOUT THE AUTHOR

...view details